मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विडंबन - विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने

उपटसुंभ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
खासदार फोडू, सरकार पाडू. काढीत जाऊ आज "व्हिप" साजणी..! असंतुष्ट गाठू,पैशास वाटू कोटीत होई सारे ठीक साजणा..! नको काळजी तू कर खुशाल बंड, इलेक्शन विना रे दुजा काय छंद तुला देतो साथी ,मी हवी ती खाती, आत्म्यास तूही थोडे वीक साजणी..! संसदेत चाले अरे हा तमाशा. डाव्या उजव्यांची कशी एक भाषा प्रतिष्ठाच सारी धुळीला मिळाली. कसे गद्दारांचे आले "पीक"साजणा..! विश्वास निष्ठा लिलावात सारे. इथे नीतीमत्ता कुठे शोधता रे ! तू का मनाशी ,लाज वाटून घेशी ? अशी लोकशाहीची आहे "रीत" साजणी..! -- अभिजीत दाते मूळ गीत - धुंदीत राहू मस्तीत गाऊ चित्रपट - बाळा गाऊ कशी अंगाई

वाचने 1380 वाचनखूण प्रतिक्रिया 1

विश्वास निष्ठा लिलावात सारे. इथे नीतीमत्ता कुठे शोधता रे ! तू का मनाशी ,लाज वाटून घेशी ? अशी लोकशाहीची आहे "रीत" साजणी..! हे कडवे, खरी परीस्थीती समोर मांडते. सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.