Skip to main content

विडंबन

(कवीतेचे पात्र)

लेखक ऋचा यांनी मंगळवार, 10/03/2009 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
(काहीही नाव न सुचल्याने हे विचित्र नाव दिले आहे) ती : कवितेचे खुन पाडताना,शब्द अडकले घशात सांग सख्या कश्या वाचु,तुझ्या कविता एका दमात? ती : पाडलेल्या कवितेतुन काही शब्द चांगले उचलुन दूर करुन बाकीचा पसारा,उरल्या ओळी तीन ही असली काव्य तुझी सगळ्यांचा करतात छळ तो : सांग कसे मग करु मी काव्य,कसे निवडु शब्द प्रोपर शुद्धलेखन हे तापदायी,आणिक काव्यछंद हे डोईफोड कविता माझी बोंबलली आणि मुक्तछंदाचीही लागली वाट.
Taxonomy upgrade extras

<<आंतरध्वनी>>

लेखक ऋचा यांनी मंगळवार, 10/03/2009 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी पहील्यांदाच विडंबन हा प्रकार करत आहे. प्रेरणा कोण? हे सांगणे न लगे... ;) घरी रीकामा वेळ काढताना भेळ करायची ठरवली असताना चुरमुर्‍याचा डबा खाली पडला आणि कांदा रडला ढसा ढसा ढसा ढसा पडलेले चुरमुरे गोळा करताना त्यातले खडे काढताना फरसाणच्या तोंडाला सुटले पाणी कैरी कापलेली पाहताना =P~ =P~ =P~ =P~ नवर्‍याला भेळ खायला देताना तोंड केले वाकडे आणि म्हणाला तो मला, "त्यापेक्षा प्रिये विकत का आणली नाहीस?"
Taxonomy upgrade extras

(प्रातःध्वनि)

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 09/03/2009 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठल्यावर अंथरूणातून आरश्यासमोर तोंड धुताना ब्रश मला म्हणाला "घास रे मेल्या घास, लवकर घास" आळस देताना अंग मोकळं करताना चुकून पोट म्हणालं ढम ढम ढम... ट्रेनच्या बाकड्यावर शेजारच्या भय्याचा घामट दर्प घेताना चष्मा म्हणाला "तरी मी तुला सांगत होतो भलतीकडे बघू नको"
Taxonomy upgrade extras

<सत्यध्वनी>

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 09/03/2009 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा तेहेरानच्या आकाशावरून उडताना शेजारच्या काकू म्हणाल्या, "मोबाईल वरच्या ब्यागेत राहिला, काढतेस का? मुलाचा एसेमेस आला का पहायचा आहे." बदलापूर स्टेशनवर वांगणीच्या गाडीची वाट पहाताना चिम्या मुंबैच्या गाडीकडे धावला. "ही गाडी वांगणीला जाईलच ना?" त्यात केवढं मोठं तत्वज्ञान होतं. जीएमेआरटीत पोस्टर्स समजावून देताना अरित्रला एक विद्यार्थी म्हणतो, "जरा बाजूला होता का?" आणि त्याने मोबाईलवर पोस्टरचा व्हीडीओ घेतला. संदर्भासहित थोडंसं स्पष्टीकरण: या सर्व खरोखरच सत्यकथा आहे
Taxonomy upgrade extras

(नारदमुनी)

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 09/03/2009 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गातल्या नारदमुनीहून श्रेष्ठ अश्या कळा लावताना हसून फेक आयडी म्हणाला ओरपा रे ओरपा तर्री ओरपा गुत्यातला पेला मिरवत मालावरची 'वळणे' पाहताना चटकन विडंबक म्हणाला प्रीतं प्रीतम् प्रीतम् क्रियेच्या योगाक्लासमध्ये इन्स्ट्रक्टरचा कामुकस्पर्श होताना गजगामिनी म्हणाली '' अय्या, मोबाईल नंबर देतायना !'' -- लिखाळ. प्रेरणा सामुद्रधुनी
Taxonomy upgrade extras

(तगमग)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 09/03/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी जिवाची एवढी 'तगमग' कधीच झाली नव्हती! सोसवेचना!! :T :O :S हा खून झाला नसता तर दिवसभर कामात लक्ष लागलं नसतं!!

बिन्धास प्या!

लेखक सहज यांनी रविवार, 08/03/2009 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ प्रेरणा गोखलेसाहेबांची सुरेख कविता व गुत्यातील सहपेताडांनी असेच चढवले म्हणून मी प्यायला घाबरत नाही बिन्धास्त पितो..! चढली मला जास्ती, तर खुशाल लटपटतो..! लुडकणे आहे तसा, प्राणिजात स्वभाव सोबर रहावे वाटणे हा खोटा अहंभाव विदेशातली पिण्यासाठी असते अपुली धडपड त्यात झाली भाववाढ तर वाढते कि हो तडफड असेल जर हे खरे तर कशास लाजायचे मिळाली पहिल्या धारेची तरच व्होट द्यायचे घोट घेता हळुहळू डोळे मिटुन घेतो मावळताच रविराजा मी फुल्ल आउट होतो सुर्याने मावळावे म्या पामराने लुडकावे याला काय गड्यानो, कोणी पाप म्हणावे..
Taxonomy upgrade extras

(बोल)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच का गं कळत नाही तुला माझ्या पोटातलं? नेहमीच तो मोबाइल घेऊन तासन् तास बसायचं! मैत्रिणींना सांगायची ती दुसर्‍यांची लफडी नी कथा जाणशील तरी कधी तु माझ्या पोटातली व्यथा? मला म्हणे फोनवर बोलता येत नाही कधी केला असाच लाडाने तर एक 'हॅलो' पण येत नाही? म्हणे सांगायला कशाला हवं? समजायचं असत ते! काय समजू मी की मेली तुझी भुक आहे? अकलेचे तारे तोडायचं नको बोलू ते सर्व माहीतच आहे पण 'लगेच ठेवुन पोळ्या करते' हे वाक्य काय अवघड आहे ? प्रेरणा: जागुताईंचे बोल

(पाहिजे वीकांत मोठा)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे वीकांत मोठा पाहिजे सोडा, टकीला पाहिजे वोडका थोडी पाहिजे पोकर, पसारा होउ दे मग रात्र कितिहि डाव हा खेळून जाउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ मिटुनि तू डोळे तुझे रे पापडी भरपूर खाशी सोबतीला श्रिम्प थोडे तू बशा घेऊन बससी छेडुनी कोणा सखीला हास्यकल्लोळात बुडवु विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ तृप्तता नरड्यात थोडी तृप्तता लीवर् मधेही शांतता विश्वात सार्‍या शांतता खोलीमधेही सटकताना रामप्रहरी काहिशी चलबिचल व्हावी झोपलेल्या बांधवांची थोडिशी चुळबूळ व्हावी सोमवारी ब्याद परते शुक्रवारी चाट देउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रवि

कुणी मत देणार का मत ?

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 06/03/2009 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
अरे याला कुणी मत देणार का मत ? ह्या तुमच्या लोकनायकाला दिल्लीत राहून सेवा करणार्‍या ह्या गरिबांच्या कैवार्‍याला कुणी मत देणार का मत ? खूप पक्ष सोडले खूप पैसे लाटले खूप काहीच्या काही केलं आणि सत्तेतल्या राक्षसाला सारखं भ्रष्टाचाराच व्यसन लागलं. बिच्चार्‍या ह्या राक्षसाला कुणी मत देणार का मत ? खातं गेलं, घर गेलं, रुबाब गेला,गाडी गेली आता मतदारसंघही बदलतोय पाच वर्षात न दिसलेल्या या भिकार्‍याला कुणी मत देणार का मत ? निष्ठेला टोपी घातली सुखी माणसाची वाट लावली मंदीतही उधारीच चालली कामांची तर वाट लावली स्वप्नातही खुर्ची पाहणार्‍या ह्या सत्तापिपासुला कुणी मत
Taxonomy upgrade extras