(पाहिजे वीकांत मोठा)
पाहिजे वीकांत मोठा
पाहिजे सोडा, टकीला
पाहिजे वोडका थोडी
पाहिजे पोकर, पसारा
होउ दे मग रात्र कितिहि
डाव हा खेळून जाउ
विसरुनी त्या सायबाला
उद्विग्नता उधळून देउ
मिटुनि तू डोळे तुझे रे
पापडी भरपूर खाशी
सोबतीला श्रिम्प थोडे
तू बशा घेऊन बससी
छेडुनी कोणा सखीला
हास्यकल्लोळात बुडवु
विसरुनी त्या सायबाला
उद्विग्नता उधळून देउ
तृप्तता नरड्यात थोडी
तृप्तता लीवर् मधेही
शांतता विश्वात सार्या
शांतता खोलीमधेही
सटकताना रामप्रहरी
काहिशी चलबिचल व्हावी
झोपलेल्या बांधवांची
थोडिशी चुळबूळ व्हावी
सोमवारी ब्याद परते
शुक्रवारी चाट देउ
विसरुनी त्या सायबाला
उद्विग्नता उधळून देउ
प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रविवारचे 'स्केड्यूल्' आणि पुष्कराजांना हवा असलेला एकांत
वाचने
2472
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
काय बेलाशेठ
वा, वा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to वा, वा by नंदन
+१
In reply to वा, वा by नंदन
हम्म्म्म....
मजेशीर
अरे ...
:-)
+१
अतिशय
मस्तच !!
हा हा..