(...उदरात ढकल काही!)
राघव यांची अतिशय सुंदर कविता ...उदयात शोध काही! वाचल्यावर अतिशय आनंद झाला आणि शोधाशोध करणारे आपण एकटेच नाही ह्या जाणिवेने बरे वाटले!
आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल जगून काय साधले
लिहून काय साधले विचारतोस केशवा
(निदान तू तरी असे म्हणू नकोस "केशवा")
जरा कुठे लिहायला तजेलदार लागले
धुण्यापरी तरी कशास बडवतोस केशवा
अरे मला विचार ना, तिनेच बोंब मारली
पुन्हा पुन्हा तिला म्हणे सतावतोस केशवा
अजून वाटते नवल कशी असेल ती बया
स्मरून जीस तू असा थरारतोस केशवा