Skip to main content

विडंबन

(उगिच भेटली घाटावर ती)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 05/03/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर ओळख सारी धुवून गेली बर्‍याच दिवसांनंतर फेस धवल तोंडाला आला धुके दाटले डोळीं लालकेशरी चार शलाका फुलून आल्या गाली चपलेचाही प्रसाद आला शिवीआरतीनंतर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर पेकाटाची मोडुन हाडे हाती घेतला हात (वळ्णावरती अवघड इतक्या सहज घातली लाथ) धडपडलो अन् धूम ठोकली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या मागे धाउन आली बुक्क्यांची मग उधळ्ण झाली कुठेकुठे ति भयंकर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर प्रेरणा: पुष्कराज यांना सहज वाटेवर भेटलेली कविता

(रांधण्याची शिकवणी)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/03/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा मागल्यासारखंच! हे रामदास काही उ(हु)च्च लिहून जातात आणि आमचा धर्म आम्हाला सोडवत नाही हो! त्यांची 'गाण्याची शिकवणी' वाचली आणी आमच्या वेगळ्याच शिकवणीचे तास डोळ्यांसमोर येऊन गेले!

मण्याच्या खिषातले - शेंगदाणे

लेखक टारझन यांनी बुधवार, 04/03/2009 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , "मण्याच्या खिषातले" या सदर्‍यातला हा माझा नवा णिबंध (जमेल तशी षेंच्यूरी करूच ,,, कांताकाका कुठे आहात? मी येतोय ) अस्पष्टीकरण - या सदर्‍यातला मुळ णिबंध कालच प्रसिद्ध झालेला होता ,मात्र त्यला म्हणावी तशी प्रसिद्धी पर्सणली मार्केटींग करूनही न मिळाल्याने हा णिबंध येथुन उडवत आहे. (उड ...उड .. ए ऊड ना !!! .. मसक्कली मसक्कल्ली ... फुर्र फुर्र फुर्रर्र ... ए उड ना .. माफ करा लोक्स ..

(आच्छू)

लेखक विकास यांनी बुधवार, 04/03/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
बोचर्‍या थंडीत हळू हळू पडणारा बर्फ विश्व गोठलेले असे वाटताना नाक मात्र वितळते... आच्छू आच्छू वसंताच्या हालचालीने झाडांना येणारा मोहर हवे मधून परागकण पसरवत जातो आणि परत... आच्छू आच्छू आच्छू पावभाजी करताना कांदे, बटाटे, मटार, टोमॅटो वगैरे घालून शेवटी वरचेवर मसाला घालताना अचानक उडून नाकात जातो आच्छू आच्छू आच्छू आच्छू -
Taxonomy upgrade extras

(फुर्र)

लेखक पॅपिलॉन यांनी बुधवार, 04/03/2009 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
कळकट मळकट टपरीवर जाऊन - खिशातले सुट्टे पैसे चाचपडत मागवलेले एकच कटिंग दोघात.. फुर्र फुर्र पोटातले कावळे ओरडायला लागल्यावर - एकच मिसळ, दोन पाव आणि तर्री... फुर्र फुर्र फुर्र निरोप देताना, जन्मजन्मांतरीची साथ असे डोळ्यात पाणी आणून सांगून - थिरकणार्‍या बारबालेल्या अदाकारीकडे पाहून, नाकात गेलेली बियर.... फुर्र फुर्र फुर्र फुर्र
Taxonomy upgrade extras

(कोण म्हणतो रात्र झाली )

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 04/03/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आताच अमुच्या जेवणाची आता कुठे सुरवात झाली बघुया चला - या फोडणीची नुकतीच टेट्रापॅकमधुनी डालड्याला जाग आली पदरही खोचला हिने अन् जिरे-मिरीची आग झाली प्रियेस माझ्या आजतर मी दगडफुले कित्येक वाहिली हिंग कुटला मी असा की धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवणाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण भूक बाकी - कहर आहे! समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते :)

<<रात्र थोडी जाहली पण>>

लेखक नाटक्या यांनी बुधवार, 04/03/2009 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कराज यांनी केलेल्या "रात्र थोडी जाहली पण" याचे विडंबन. पुष्कराज: ह. घ्या. कोण म्हणतो रात्र झाली आत्ताच आमुच्या पिण्याची आत्ता कुठे सुरवात झाली फिरुनी पुन्हा या चाकण्याची नुकतीच वाटी सारी सरुनी चाकण्याला केळी आली कहर पुन्हा झाला असा की जेवण्याची वेळ झाली दारूस माझ्या आजवरी मी गाली कैक हो वाहिली गंध ऐसा त्या सूराचा नशा आजही राहीली त्याच नशेने अजुनी पिण्याला बहर आहे रात्र थोडी जाहली पण सोंगे बाकी फार आहे - नाटक्या गैरसमज नको माझ वय फक्त ८५ आहे

<<गुत्ता>>

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 03/03/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
ह्ये आमच पन बॅकग्रांवड: सगला जलम खारपाड्यान राऊन आमच्या सरवांच्ये गूडग्यावर जरा जादाच परनाम जाला. घरसूदा येवड यकट क सगल्यान जवलचा शेट्टी आन्नाचे गुत्याव सूदा ४५ मीन्ट चालाला लागाच. सनक http://www.misalpav.com/node/6396 आंदारलेल्या गूत्याजवलच चीप जीपड न बाजुचे गटारान बेवड्यांच वकनं वॉक वॉक आतड जालनारी दारू पन ती न चडनं सकाली सा वाजताच घरापाटी तरास देनारा आजासचा आवाज खॉक खॉक खॉक दुपारच्या येलेत तारेतच उटणं न अन भुकेल्या पोटी गावटी कुत्र्यांच भुकनं भॉक भॉक भॉक भॉक भॉक
Taxonomy upgrade extras

<ते>

लेखक ब्रिटिश टिंग्या यांनी मंगळवार, 03/03/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग टिंग डिंग, टिंग्डिंग डिंग डिंग डिंग....... संपला एकदाचा कॉल. आमच्या टीममध्ये दररोज ३:३०ला स्टँडअप कॉल असतो. चहा-बिडी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, डीजे, अमित जोशी, सीपी आणि प्रभाकर सौमिनारायणन (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण कॉल चालु असताना क्लायंटकडुन अन् कॉल संपल्यावर पीएमकडुन मजबुत शिव्या खातात) आणि इतर फ्रेशर पब्लिक (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमच्या कँटिनच्या टेबलावर गप्पा मारत बसलो होतो.

(मूल)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 03/03/2009 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर उह आह गजबजलेल्या दवाखान्यातली बेभान लगबग अन फत्तरासारख्या काळजातले गोठलेले काहूर होणार मूल होणार मूल असतोच दडलेला काहिंच्या मनात बाजेवर उफाळणारा गुलाबी प्रणयपूर भरपूर भरपूर --लिखाळ. (प्रेरणा-शरदिनी यांची कविता पूल )
Taxonomy upgrade extras