मंजूर नाही
लेखनविषय:
नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही !
कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही !
तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही
हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?
तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !
मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही
लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !
अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '
वाचने
17666
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
कशी साथ
In reply to कशी साथ by मदनबाण
+१
अतिशय सुंदर गझल
अरे, त्या
In reply to अरे, त्या by यशोधरा
+१
In reply to +१ by अनिल हटेला
+२
"मंजूर नाही "...कबुल है!
ओह ! अत्यंत
सुरेख..!
तुझ्या
मंजूर!!!
झकास!
एकदम झक्कास!
मिष्किल रुसवा नामंजूरी
क्लास् !!
मंजूर नाही
खणखणीत
अप्रतिम
संदीप
In reply to संदीप by निमीत्त मात्र
नामंजूर
In reply to संदीप by निमीत्त मात्र
प्रेरणा
In reply to प्रेरणा by क्रान्ति
पण जरा जमले तर..
जबरदस्त!!
समजली नाही
कविता
आवडली...
उत्कृष्ट!
फार छान
लपेटून घ्यावे तुला मी
तुमची गझल
सुंदर
दुर्लक्षून जावे अशी ही कविता नाही!
In reply to दुर्लक्षून जावे अशी ही कविता नाही! by नरेंद्र गोळे
गझल आणि कविता
In reply to दुर्लक्षून जावे अशी ही कविता नाही! by नरेंद्र गोळे
लपेटून घ्यावे तुला मी, मला तू
ओळ अन ओळ पुन्हा पुन्हा वाचावी अशी...
मस्त गझल
अप्रतीम गजल