मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी पुन्हा येईन

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
कच्चा माल घेतले तू उधार पैसे आता देत नसशील करण्यास ते वसूल मी पुन्हा येईन जात असले मी माहेरी करू नका तुमची थेरं पाहण्या ते सारं मी पुन्हा येईन नाही लिहीता येत पेपर कॉपी जरी करशील काय ते तपासण्यास मी पुन्हा येईन मला न दाखवता व्हाटस अप मेसेज पाहता काय ते पाहता ते पाहण्यास मी पुन्हा येईन लेख वगैरे लिहीता येथे भारी पण या कवीतेला प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या मी पुन्हा येईन - पाषाणभेद ११/११/२०१९

वाचने 6581 वाचनखूण प्रतिक्रिया 10

मी प्रतिक्रीया दिली त्यावर तुम्ही धन्यवाद म्हणाले की नाही हे पहायला मी पुन्हा येईन, पैजारबुवा,

गणेशा Mon, 11/11/2019 - 15:00
ही लाईन घेवुन मला लिहायचे होते :) पण आता तुम्ही लिहिले आहे म्हणुन ते परत परत वाचण्यास मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन ..

नाखु Fri, 11/22/2019 - 12:31
वा कुणी लिहिलेले वाचले नाही तरी मी पुन्हा येईन आणि पुन्हा पुन्हा येईन. मिपावर फेरफटका मारायला आवडणारा नाखु