Skip to main content

विडंबन

बॅंक- एक भयाण अनुभव

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 18/12/2020 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज महत्वाचे काम होते बॅंकेचे. काहीही करून ते आजच पूर्ण करायचे होते. काम तसे पाच मिनिटाचेच होते. पण पुर्वानुभव लक्षात घेता चांगला एक - दीड तास बाजूला काढून ठेवला होता. गाडी चालू केली की लक्षात आले पेट्रोल संपले आहे. बहुधा माझ्या मुलाने संपवले असावे. रोजचे दोन - दोनचे 'पॅक' संपतात म्हणजे काय ? एवढे काय फिरायचे असते काय माहिती ! एकचा नवीन पॅक टाकून मी गाडी सुरु केली. मुख्य रस्यावर पोहचलो तर स्त्यावर ही मोठी गर्दी. कसाबसा बॅंकेच्या गेटपर्यंत पोहचलो. तिथे एक वॉचमन निर्विकार चेह-याने माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. गेट उघडायला तो तयारच होईना.

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

लेखक गड्डा झब्बू यांनी मंगळवार, 08/12/2020 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती.

म सा वी

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 06/12/2020 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे? म्हणजे विलायती देशी पहिल्या धारेची (हातभट्टी) ह्या मधली कुठली निवडायची? कुणाला आईस जास्त लागतो कुणाला कमी कुणाचा चिअर्स तर कुणाचा चांगभलं कुणाचा चखना काजू तर कुणाचा चकली फारच घोळ आहे बुवा. कुणाचा एक पेग पुरतो तर कुणाचे दोन शिवाय मजा नाही .... .... .... कुणी तरी सुरापानासाठी बोलवा रे प्रेर्ना अर्थातच लघुत्तम साधारण विभाजकाची

डोक्याला शॉट [ (पेट्रोल) पंचमी ]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 28/11/2020 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
हेल्लो फूल्स... आवाक झालात ना ? मी आज नमस्कार चमत्कार करायचा सोडून तुम्हाला डायरेक्ट हेल्लो फूल्स... म्हणतोय म्हणून... येस...आय न्यू धिस! मला हे आधीच माहित होतं की मी असं बोलल्यावर तुमच्या थोबाडावर असेच बावळट भाव येतील म्हणून... कसं ते विचारा... लाजतांय काय असे विचारायला?

उगवता "तेजस्वी" तारा

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 12/11/2020 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्रोत खरंच आज देशाला तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि नक्कीच ती उणीव आपले तेजस्वी यादव भरून काढतील. त्यांना नाही जमले तर अजुन 11 तरुण कार्यकर्त्यांची अख्खी फळीच लालू यादवांनी घरी उभी केलीये. खूप खूप उपकार आहेत या भारतभुमीवर कि एकाच घरात त्यांनी इतके तरुण कार्यकर्ते निर्माण केले. इथेच न थांबता त्यांनी स्त्रीसशक्तीकरण देखील आपल्या घरातूनच सुरु केले. पहिल्यांदा स्वतः करून दाखवायचे आणि आपल्या कृतीतून समाजाला संदेश द्यायचा या थोर विचारसरणीचे ते पाईक आहेत..

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 15/10/2020 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

स्थलांतर..

लेखक Vivekraje यांनी गुरुवार, 01/10/2020 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव.. शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव.. रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं.. मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं.. थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल.. माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल.. तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला.. उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला.. घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती.. आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती.. जायला रस्ते भरपूर होते, पण साधन काही मिळणार नव्हते.. स्थलांतरित मजुरांचे हे दुःख कधी कुणा कळणार नव्हत

हळव्यांची गळवे

लेखक उपयोजक यांनी रविवार, 27/09/2020 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनावर यांच्या ठसठसणारी गळवे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. गैरसमज करुन घ्यायला हे नेहमी पुढे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे इतरांना टोचतील; प्रत्युत्तरे त्यांना नको आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे नेहमीच बरोबर असतात; इतर लोकच चुकत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. भावनांना डिवचलेत? आता ते सूडाच्या तयारीत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. शब्दबाण मारलेत?
Taxonomy upgrade extras

डोक्याला शॉट [चतुर्थी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शुक्रवार, 11/09/2020 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. ***** ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या. काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते.