मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतकेच मला जाताना

मिल्या · · जे न देखे रवी...
काव्यरस
प्रेरणा : गुरुवर्य सुरेश भटांची गझल इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना परदेशी कळले होते 'माय नेम इज खान' म्हणूनच गोर्‍याने छळले होते ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते मी लबाड इतका आहे हे सांग कुणा कळले का? मी पैसे 'कोल्ह्याकडुनी' आधीच उकळले होते त्या माजी राष्ट्रपतींची मी उगाच नक्कल केली लावून दिवे अंबर का हे कधी उजळले होते? स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते माघारी आल्यावरती मी शब्द फिरविले सारे करणार काय लोकांचे जर पित्त खवळले होते? झालेल्या नामुष्कीला सारेच चला विसरू या पाऊल घसरले होते डोकेही चळले होते

वाचने 1907 वाचनखूण प्रतिक्रिया 6

स्वाती२ 17/09/2009 - 17:18
मिपावर स्वागत! विडंबन नेहमीप्रमाणे झकास.

क्रान्ति 17/09/2009 - 18:36
ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते =D> =D> सही! मस्त विडंबन! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

संदीप चित्रे 17/09/2009 - 18:37
>> स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते मस्तच एकदम.. लै दिवसांनी दर्शन दिलंत ?

प्राजु 17/09/2009 - 20:11
मस्त!!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मिल्या 21/09/2009 - 19:08
सर्वांना खूप खूप धन्यवाद संदिप अरे आहे की इथेच आहे.. कुठे जाणार?