(शेवट)
आमची प्रेरणा बेसनलाडू यांची सुंदर गझल शेवट
भात मी असा हाती घ्यावा..खाता खाता
ओघळ अन तेव्हाच गळावा..खाता खाता
सोबत घेतो तूप वरण अन लिंबू मी ही
असा रोज सहभोज घडावा..खाता खाता
रोज असा हा पंगतीमध्ये बेत बनावा
बोटांवरती स्वाद उरावा..खाता खाता
एक घास ही पुढे मला खाता ना यावे
अग्रह हा इतका न करावा..खाता खाता
खूप वाढले अग्रह अन, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला विडा मिळावा..खाता खाता
तृप जेवला "केश्या" आता पडतो क्षणभर
डुलकीने या शेवट व्हावा..खाता खाता
लेखनविषय:
याद्या
2938
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
अगदी
सहमत आहे
In reply to अगदी by श्रावण मोडक
व्वा! आता
In reply to सहमत आहे by बेसनलाडू
व्वा
In reply to व्वा! आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा!
:)
मस्त...
खूप वाढले
ग्रेट!
..अतिशीघ्र...
मंग गुर्जी
In reply to ..अतिशीघ्र... by कानडाऊ योगेशु
हा हा! मस्त
मस्त ! मजा
मस्तच पंगत लावलीये हो गुर्जी!
सुंदर
मस्त
धन्यवाद!!