Skip to main content

हिरवा साज

लेखक जयवी यांनी बुधवार, 25/11/2009 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम बरसतो सखा साजण पाऊस साज घेऊन हिरवा, येतो साजण पाऊस तिची प्रतिक्षा ओलेती अन सखा ही आतूर पानापानात शहारा, कणाकणात अंकूर हिरवाईचे डोहाळे तिचे पुरवतो सखा खुळावते राणी कशी साज लेऊन अनोखा मिरविते नवा शालू भरजरी तो हिरवा प्रेमसरीत भिजूनी चढे रंग गाली नवा मेघ दाटती नभात तिचे बघण्या कौतुक हलकेच उतरती, घेती चुंबन नाजुक तीट लावियतो गाली, वारा हळूच वाकून शेला फुलांचा रंगीत, धरा घेते पांघरुन जयश्री अंबासकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3358
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

छान कविता... :) मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo

नेहमीप्रमाणेच छान, बोलकी कविता!

मस्त आहे. मीनल.

मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

धरेचा श्रुंगार ही आवडला. **************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

जयवीताई, कविता आवडलीच. आणि ही दाद ... अदिती

कविता आवडलीच. एकदम चित्रदर्शी. डोळ्यासमोर उभे केले ते वातावरण. बिपिन कार्यकर्ते

वा जयू..! जियो.. (जयूचा फ्यॅन) तात्या.

जयश्री कविता आवडली गं.... आणि स्फुर्तीकारणही......:)

मनापासून धन्यवाद लोक्स :) माझी कविता इतक्या माज, डास,खाजांना कारणीभूत ठरली ह्याचा विशेष आनंद वाटतोय ;)