आमार कोलकाता - भाग ५
लेखनप्रकार
- Read more about आमार कोलकाता - भाग ५
- 20 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील :
भाग १ - http://www.misalpav.com/node/45320
भाग २ - http://www.misalpav.com/node/45361
भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433
भाग ४ - https://misalpav.com/node/45481
आमार कोलकाता - भाग ५
कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते बरेच जुनेही आहे. नेमका कालावधी सांगायचा तर सव्वादोनशे वर्षे जुने !! आज प्रचलित असलेल्या स्वरूपातल्या (फॉरमॅट) ‘बंगाली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची कहाणी अद्भुत म्हणावी अशी.
चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.
जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.
हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.
१७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून ते १८५७ च्या ‘गदर’पर्यंतच्या वर्षशंभरीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन सर्वशक्तिमान होताना बघितले.