Skip to main content

संस्कृती

दाराआडची चमेलीबाई ( आणि ती सटवी रोहिंगीण)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 08/04/2019 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: दाराआडची मुलगी. . चमेलीबाई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वत:च्या बाहेर, कमाठीपुर्‍याच्याही पल्याड - भूतभविष्याच्या आरपार ... तिकडे दूर इस्माईल बसला आहे... . केसांचा कोंबडा काढून "दिल का भंवर करे पुकार" ...

दाराआडचे घड्याळ

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 05/04/2019 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
. एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार... जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ... . आणि एक वाळूचे घड्याळ... . अजुनही मागे मागे.... जिथे आहे घंगाळात तरंगणारे घटिका पात्र

दाराआडची मुलगी

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 03/04/2019 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध.... करत असेल का तो ही तिचा विचार? जात असेल का तो ही स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे? मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते, ते डोळे डोळ्यात घेऊन मुलगा शांतपणे जागा राहतो.... डोळे हरवलेली मुलगी घर नसलेल्या दाराआडून बघत राहते... बघतच राहते.... -शिवकन्या
काव्यरस

अनोळखी शिक्षक

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 29/03/2019 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज अंक्याची mains असल्याने सकाळी साडेआठलाच हडपसरला गेलो होतो.त्याला केंद्रावर सोडून लगेचच परत यायला निघालो. PMTटँडवर वेळ सकाळची असूनसुद्धा गर्दी होतीच.कोथरुड डेपोची बस पकडायला मी गेलो तर माझ्या आधी १०- १५ मंडळी बसच्या पुढच्या दारातून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. बसायला जागा मिळणार नाही असच वाटत होत पण हार मानिन तो मी कसला?? त्याच गर्डीमधून धक्के देत, मोबाईल आणि पकिटकडे लक्ष्य देत मी बसमध्ये शिरलो.नक्कीच काहीतरी achieve केल्याची फिलिंग होती....!!! बसमध्ये पहिली windo seat मिळाली होती. शेजारची सीट अजूनही रिकामी होती..

डोंगरप्रेम

लेखक अनुप देशमुख यांनी रविवार, 24/02/2019 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मावळतीला लालीच्या साक्षीनं ती दोघच डोंगर उतरत होती, दिवसभराचा शीणवटा दोघांनाही जाणवत होता. डोंगराची उतरण दोघांनाही एकमेकांचा स्पर्श करण भाग पाडत होती. अखेरच्या टप्प्यावर डोंगरानं त्यांना अजून जवळ येण भाग पाडलच. शेवटच्या पायरीवरून ती जवळजवळ उडी मारून डोंगरापासून विलग होत म्हणाली ती : ए झाला यार ट्रेक पूर्ण! तो : हम्म! ती : काय झालंय म्हसोबा? तो : काहीं नाही. ती : तू कुठे जाणार आहेस आता. तो : तळेगाव. मित्राकडे. ती : का बसायचा प्लॅन आहे का. ह्या ह्या ह्या! तो : काहीही हा तू पण! ती : नाही, तुच्यासोबत बसणार नसशील तर माझ्या सोबत बस.

संथ वाहते...

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 18/02/2019 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
"संथ वाहते, कृष्णामाई..." कृष्णातीरावरील एक संथ पहाट... सूर्योदयापूर्वी सांगलीचे सर्वेसर्वा आपल्या दैनंदिन मॉर्निंग वॉकसाठी कृष्णातीरावर निघालेले... त्यांच्यापाठोपाठ त्यांचे चार-पाच प्रशंसक... पहाटेचा फेरफटका, आन्हिकं आणि देवपूजा उरकायच्या आत काहीही न खाण्यापिण्याचा सर्वेसर्वांचा कित्येक वर्षांचा दंडक.... चालताचालता सर्वेसर्वा काही 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' करताहेत आणि प्रशंसक त्यावर दुजोरा भरताहेत... नदीकिनार्‍याशेजारीच सांगली एमायडीसीचे नवीन प्लॉटस आखलेले, सर्वेसर्वांचाच नवा उपक्रम, सांगलीत नवे उद्योग उभारण्यासाठी... पाडलेले प्लॉट्स बहुतांशी अजून मोकळेच, क्वचित कुठे एखादी शेड उभारलेली.

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 30/01/2019 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

एक मोहक दुनिया..एक खेळ..पोकर

लेखक सजन यांनी मंगळवार, 15/01/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
पोकर म्हटले कि लगेच डोळ्यासमोर येतो तो ओशन ११ किंवा जेम्स बॉण्डच्या सिनेमांमधून आपल्या समोर आलेला पोकर, वाळवंटातली मायानगरी लास वेगस (Las Vegas) ज्याच्या जीवावर चालते तो पोकर, कोट्यावधींची ज्या खेळात उलाढाल चालते तो पोकर, ज्याच्या अनुशंघाने नकळत ज्याचे समीकरण गुन्हेगारी वर्तुळाशी लावले जाते तो अपनेही आपमें एक गूढ वलय बाळगणारा पोकर. भारतीयांनाही पोकर तसा नवा नाही. घरोघरी दिवाळी-गणपतीत चालणाऱ्या पत्ते-पार्टीज् असो की, रस्त्याच्या बाजूला कोंडाळे करून, तोंडात काडी धरून खेळलेला तीन पत्ती असो, पोकर म्हणजे जुगारच.

सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)

लेखक मनो यांनी रविवार, 30/12/2018 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.

वाट त्याची पाहाता....

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 12/12/2018 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वच संतांच्या चरणी नतमस्तक होऊन; एक लहान प्रयत्न केला आहे.... मागे पाहता वळून वाट गेली हो पुसून भविष्यापासून सोडवि कोण आता मग विचार कशापरी चालत रहा परोपरि विश्वचक्र तो फिरवि तू फ़क्त एक धागा गुंफ़त राहावे स्वतःला फुला-पाना-माणसांना निसर्गाच्या देणगीचा अवमान कैसा करा तुझी वेळ खरी येता   तो करेल उद्धारा तोवर चरणी माथा त्याच्या टेकवावा
काव्यरस