Skip to main content

संस्कृती

हिंदू खतरे में

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 25/09/2018 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी कुठलाही देश नसेल पण भारत हा एक असा देश आहे की जिथे हिंदू खतरे में आहे. हिंदूंना हिंदू म्हणून जगणे या देशामधे मुश्किल झालेले आहे. गणपतीचा उत्सव आला की स्पीकर्स लावायचे नाहीत. रस्त्यावर खड्डे खणायचे नाहीत. रस्त्याच्या मधे मांडव घालायचे नाहीत. अशी अनेक बंधने हिंदूंवर घातली जातात. आता थोड्या दिवसात नवरात्र येईल. नवरात्रीच्या वेळेलासुद्धा हिंदूंच्या व्यक्त होण्यावर, अभिव्यक्तीवर बंदी येईल. नऊ दिवस हिंदूंनी दांडिया खेळायचा नाही.

श्रीगणेश लेखमाला २०१८ - समारोप

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 24/09/2018 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी एक हुरहुर असते, तशी काहीशी भावना श्रीगणेश लेखमालेचा समारोप करताना आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही मिपावर श्रीगणेश लेखमाला-२०१८ आयोजित केली होती. यंदा 'DIY - Do It Yourself - केल्याने होत आहे रे' अशी संकल्पना घेऊन लेख मागवले होते.

बोली बोली बायका बोली

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 21/09/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ...

मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/09/2018 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या १. एक प्रेमपत्र २. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . . ३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!! नमस्कार! मुलीच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या वाढदिवसानिमित्त तिला लिहिलेलं चौथं पत्र. ह्यामध्ये असलेले विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात आले असतील व तसेच अनुभवही आले असतील म्हणून आपण सर्वांसोबत शेअर करत आहे.

डिजीटल डिजीटल

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 15/09/2018 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
जी माणसे कुठल्याच डिजीटल प्रोफाईल मध्ये नसतात, त्यांचे जगणे कसे असेल, हा प्रश्न मला छळू लागला, आणि मला माझ्या डिजीटल विचारांची भिती वाटू लागली... जी माणसे ऑफलाईन असतात त्यांचे लाईफ कसे असेल या प्रश्नाने मला परेशान केले आणि मला माझ्या डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली... मग, या डिजीटल तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहताना मी विंडोजमध्ये डोकावून पाहते... तर, खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून हादरून जाते, आणि परत विंडोजमधून आत येऊन माझ्या

गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 12/09/2018 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.

मी पाहिलेले दशावतारी नाटक!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 21/08/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
दशावतारी नाटक ही मालवणी मुलूखातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन लोककला. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांतील तसेच इतर पौराणिक व्यक्तिरेखा घेऊन रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यांतील कथा या नाटकांत रंगमंचावर सादर केल्या जातात. मला अलीकडेच म्हणजे 2018 च्या ऑगस्ट महिन्यात 11 तारखेला दशावतारी नाटक बघण्याचा योग आला. तसा मी व्यवसायाने इंजिनियर म्हणून एका खासगी कंपनीत मी कार्यरत आहे पण सर्व प्रकारच्या कलेची तसेच अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींची लहानपापासूनच मला आवड आहे आणि छंद म्हणून मी विविध विषयांवर लिहीत असतो.

पूर्णब्रह्माचा अपमान!!

लेखक आनन्दा यांनी रविवार, 19/08/2018 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली.

भारांच्या जगात... ३

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 09/08/2018 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
भारांच्या जगात... ३ मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत मुक्काम शेंडेनक्षत्र ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा दुसरा रोमांचकारी भाग!.

शांतीदूत भारत

लेखक Sarita Dyahadroy यांनी शुक्रवार, 03/08/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
शांतीदूत भारत भारत अमुचा जगात साऱ्या,विश्वशांतीचा देतो नारा , शांतीदूत हा, या जगताचा बहुधर्माचे बहुवंशाचे, भारतवासी एक दिलाचे, विविधतेत शोधून एकता पालन करिती सहिष्णुतेचे देव धर्म अन ऐक्याची, शिकवण एका गंगेची पवित्र गंगा आणि तिरंगा, वंदन करीतो भारत सारा शांतीदूत हा, या जगताचा हिमालयातून उगम पावती, अवखळ खळखळ नद्या वाहती, पावन तिर्थी मंगल क्षेत्री ,गंगेमध्ये विलीन होती, सवे घेउनी सर्व नद्यांना ,गंगा मिळते थेट सागरा, भारतदेशा दयासागरा,वैश्विकतेचा तुला किनारा, .