Skip to main content

संस्कृती

बनपाव की करवंट्या.......?

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार

लेखक जालिम लोशन यांनी सोमवार, 22/07/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
उत्सव बालपणीचा मीरा फाटक माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत.

युगांतर - आरंभ अंताचा भाग ४ व ५

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 21/07/2019 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे? संपूर्ण रात्र अस्वस्थपणामुळे जागा राहिलेला शंतनू. तिचे रूप, डोळे, लाघवी हास्य त्याला बोलवत होते. तो तरी कसा थांबवू शकणार होता स्वतःला? शंतनूचा रथ नदीतटावर थांबला. सुर्यदेव अंबरात पसरलेल्या लाल रंगावर केशरी-पिवळ्या रंगाचे लेपन करत होते. नदी प्रवाहात त्याचे पडणारे प्रतिबिंब, हवेतला आल्हाददायक गारवा, अंबरातली केशरी रंगाची उधळण....

वाई-मंत्र

लेखक मी_आहे_ना यांनी शुक्रवार, 19/07/2019 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
(चेपुवर पूर्वप्रकाशित. सातारा जिल्ह्यातल्या वाई सारख्या टुमदार गावात गेलेलं बालपण शब्दांकित करण्याचा छोटासा प्रयत्न.) मंडळी , "वाईमंत्र" ही लेखमाला माझ्या आवाक्यातील आठवणींनुसार लिहिली आहे. आमच्या बालवाडी ते ४थीच्या शाळेचा व्हॉट्सअ‍ॅप गृप निमित्त ठरला आणि आठवणींची एक मालिकाच बनत गेली. ती एकत्र करुन इथे पोस्ट करतोय. कदाचित इतरांनाही त्यांच्या लहानपणीचा प्रवास आठवेल. वाईमंत्र-१ 'वाई' - हा शब्दच जणू एखाद्या मंत्रासारखा. आणि आपण सगळे भाग्यवान की आपल्याला कोणाला तो वेगळा शिकायची गरजच नाही, तो आपल्याला जन्मत:च येतो :) तर अश्या ह्या वाई मधलं १९८० चं दशक.

युगांतर- आरंभ अंताचा!

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 19/07/2019 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा! युगांतर- आरंभ अंताचा! महाभारत! ही कथा नक्की कोणाची? सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची?

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 17/07/2019 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

मंतरलेले दिवस – १

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 16/07/2019 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या महायुद्धातली गोष्ट. लंडनवर जवळजवळ रोज बॉंबवर्षाव. अशा काळात शहरात ‘ब्लॅक आऊट’ पाळतात तसा लंडनमध्येही तेव्हा होता. रस्त्यावरचे दिवे बंद. प्रत्येक घराच्या प्रत्येक खिडकीला जाड पडदे. प्रकाशाचा कवडसा देखील बाहेर येता नये. रात्री शहर कुठे आहे हे बॉंबफेक्या विमानांतून नुसत्या डोळ्यांनी दिसू नये म्हणून घेतलेली दक्षता. नाईट व्हीजन गॉगल्स अजून आले नव्हते. असेच कडक ब्लॅक आऊटचे दिवस. एके सायंकाळी एका घरातून प्रकाशाची तिरीप बाहेर येत होती. गस्त घालणारा एक पोलीस त्या घराचा दरवाजा अधीरतेने ठोठावतो. दार उघडणार्‍या व्यक्तीला पोलिसी खाक्याने दरडावत काळजी घेण्यास सांगतो.

प्रस्थापितांचे सामाजिक भान

लेखक सर टोबी यांनी शुक्रवार, 12/07/2019 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखात प्रस्थापित म्हणजे ज्यांनी जीवनातील अनिश्चितता संपवून स्थैर्य प्राप्त केले आहे असे सर्व जण. आता यातील प्रत्येक जण जाणीव पूर्वक समाजाकरिता काही करेलच असे नाही. परंतु ज्या देशात पदोपदी तुम्हाला जीवनाशी झगडणारे लोक दिसतात तेथे प्रस्थापितांकडे आपसूकच 'टॉर्च बेअरर' या अर्थाने बघितले जाते. आणि म्हणून त्यांचे सामाजिक भान असणे किंवा नसणे हे देखील इतरांसाठी महत्वाचे असते. तर हा असा प्रस्थापित एकूणच समाजासाठी आणि देशासाठी कळत नकळत महत्वाची भूमिका बजावत असतो. या समाजाने जर पुरोगामी भूमिका पत्करली तर इतर समाज घटक देखील अशा गोष्टींचे अनुकरण करतात.

तुझे शहर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 02/07/2019 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

मी तुझा विचार करते

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/06/2019 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......