Skip to main content

संस्कृती

जागरण....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 11/06/2019 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल झोपता झोपता, वेळ बाराची आली. आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली. अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग! बागडू लागलं,खेळू लागलं, माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

आठ चौपन्न

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 04/06/2019 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
आठ चौपनचा सगळा ग्रुप दहा मिनिटं आधीच प्लॅटफॉर्मवर गोळा झाला आणि पेपरांची देवाणघेवाण सुरू झाली. फलाटावरल्या स्टॉलवरच्या पोऱ्यानं पाण्याच्या दोनतीन बाटल्या आणि कचोरीचं पुडकं एकीच्या हाती आणून दिलं तेवढ्यात गाडी फलाटावर येतच होती. हातातल्या पर्स, पिशव्या, छत्र्या सावरत सगळ्याजणींनी एकमेकींकडे पाहून डोळ्यांनीच इशारे केले, आणि झेपावायच्या तयारीत त्या उभ्या राहिल्या... गाडी पुरती थांबायच्या आधीच सगळ्याजणी जागा पटकावून स्थिरावल्या होत्या... पुढच्या दोनतीन मिनिटांत डबा खचाखच भरून गेला आणि पुन्हा इशारे झाले...

|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||

लेखक मनो यांनी रविवार, 26/05/2019 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
इ. स. १६६६. या वर्षातील महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगझेब यांची आग्रा येथे झालेली पहिली आणि शेवटचीच भेट, महाराजांची नाट्यमय सुटका आणि स्वराज्यात सुखरूप प्रयाण. या सर्व घटनाक्रमाला आता 352 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक भेटीविषयी हे काही नवे तपशील. या तपशीलातून आपल्याला आज प्रथमच भेटीची जागा कशी दिसत असावी, महाराज कुठे उभे असावेत, बादशाह कुठे बसत असे याविषयी काही अंदाज बांधता येतो.

रमजानी लाईफ ...

लेखक सरनौबत यांनी शनिवार, 25/05/2019 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा ७ मे पासून ‘रमजान महिन्याला प्रारंभ झाला. भारतात मुस्लिम वस्ती नसलेल्या भागात रहात असल्यास आपल्याला ‘रमजान’ बद्दल फारशी माहिती नसते. वर्तमानपत्रात मुस्लिम भागातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि राजकीय नेत्यांच्या इफ्तार पार्ट्यांचे फोटो अधून-मधून येतात त्यामुळे निदान रमजान चालू आहे ते तरी समजायचं. नाहीतर रमजान ईद ची सुट्टी आल्याशिवाय असला काही प्रकार महिनाभर चालू आहे ह्याचा पत्ता देखील नसायचा. रमजान म्हणजे दिवसभर रोजे (कडक उपास) आणि संध्याकाळी चिकन- मटण हाणत इफ्तार इतकीच मर्यादित माहिती मला होती. काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त मस्कतला (ओमान देशाची राजधानी) आलो.

शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 20/05/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन! वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला.

रियल रियल

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 14/05/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या.... मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या लिक़्विड जमान्यात प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत ओहो....ते काय असते आणि? आठवण बिठवण वेड्यांचा बाजार... एक कॉल मारायचा नाहीतर मेसेज धाडायचा बात करनेका मामला खतम. मनात आठवण, झुरणे बिरणे अरेरे, हाताबाहेरच्या केसेस... डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल एवढेच काय ते रियल रियल बाकी जग तो मृगजल मृगजल... मीराबाई मीराबाई, तो तुम्हाला उन्हात भासे.... राधाबाई राधाबाई, तो तुम्हाला जलात दिसे.... भ्रम भ्रम भ्रम भ्रम भ्रम नुसते नुसते भ्रम.....

96 - प्रेमाचा धवलगिरी

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 08/05/2019 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/04/2019 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर आशाळभूत नजरेने. किती बाहेर ? मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर.. ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे... समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे, हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ... देतील का ते मला सिंहासन मिळवून ??? पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे. चुस्त, मस्त, व्यस्त .... चतुर, धाडसी, जबरदस्त ... नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत. चौकीदाराला मिठी मारून झाले ...

तळवे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 13/04/2019 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या

वसंत उत्सव

लेखक स्वामि १ यांनी सोमवार, 08/04/2019 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
तहान सरली सुरेख थंडी फोफावला ऊन्हाळा संतप्त सूर्य आता ओकेल तप्त ज्वाळा पक्षी दिशा दिशांना फीरतील ते थव्यांनी सुकतील कंठ त्यांचे शोधतील ते पाणी सुकली तळी जळांची पिण्यास नाही पाणी लहान सानुल्या जीवांची होइल लाही लाही त्यांच्या जीवाकरिता इतकी कराच सेवा वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा....! वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा.....! धन्यवाद
काव्यरस
Taxonomy upgrade extras