Skip to main content

संस्कृती

सलीम मन्सुरांचा मुस्लीम सत्यशोध

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 24/07/2018 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
सलीम मंसूर हे भारतीय वंशाचे कॅनेडियन प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र आणि इस्लाम आणि मुस्लीम सत्यशोध आणि प्रबोधनाच्या दिशा हा त्यांच्या लेखन आणि व्याख्यानांचा मुख्य विषय आहे. त्यांची सर्वच मते मला पटली असे नाही पण भारतीयांना त्याबाबत मनन आणि चर्चा करणे आवडू शकेल असे वाटते. या पेक्षा अधिक माहिती देण्या पेक्षा युट्यूब लिंक्स देतो. त्यातील ११ मार्च २०१८ ची युट्यूबवरील मुलाखतच प्रथम पहावी.

वेगळ्या प्रतिमांचे मुस्लीम

लेखक माहितगार यांनी शनिवार, 21/07/2018 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना टिका करायच्या आहेत त्यांनी माझ्या आधीच्या धाग्यांवर जावे, ज्यांना (खरोखर उपरोधाने नव्हे) मुस्लीमातील (परधर्मीय/नास्तिक द्वेष, तकफीर, हिंसा नसलेला) नेमस्तपणा (मॉडरेशन), सुधारणावाद, प्रबोधनवाद, आधूनिकता, अनुकूलनीयता, सहिष्णुता, लवचिकता, अभिव्यक्ती स्वात्रंत्र्य, कला आणि संस्कृती स्वातंत्र्याची बुज राखणार्‍या, रचनात्मक आणि सकारात्मक योगदानाचे कौतुकाचे दाखले देणे शक्य आहे त्यांनी धागा लेख न वाचताही प्रतिसादातून मनमोकळे कौतुक करण्यास हरकत नसावी.

श्रीगणेश लेखमाला - २०१८ !

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 18/07/2018 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
एक राजपुत्र होता. सेवकांच्या गराड्यात वाढलेला. लाडाकोडात वाढलेला. शब्दही खाली पडू न दिला जाणारा. त्याला एक सवय होती - जेवण झालं, की एकातरी भोजनपात्राचा चक्काचूर केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. उगाच, काही कारण नसताना. राणी अस्वस्थ होई. राजा म्हणे : "अगं, आपल्याला परवडतंय रोज एक भांडं फुटलं तरी. आपण राजपदावर उगाच आहोत का?" पण राणीला पटत नसे. तिने राजपुत्राची ही सवय मोडायचं ठरवलं. तिने राजकुंभकाराला बोलावून घेतलं. राजपुत्राला सांगितलं, तू यांच्याकडून मातीचे घडे बनवायला शिकायचंस. भविष्यात राजा होण्यासाठी हे गरजेचं आहे.

मुस्लीम सत्यशोध आणि अंधश्रद्धा निर्मुलन

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 17/07/2018 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मुस्लीम धर्मीय अंधश्रद्धांबाबत चर्चा करताना पहिला अडथळा तथाकथित पुरोगाम्यांचा असतो, कोणतीही उणीव घ्या ती ईतरही धर्मात आहे ना ! मग मुस्लीमांच्या उणीवा अभ्यासल्या जाऊ नयेत असा हा युक्तीवाद असतो. खरेतर एकाच्या उणीवेने दुसर्‍यांची उणीव झाकली जात नाही. पण तरी सुद्धा तुम्ही मुस्लीमांसोबत चांगले मुद्दे लक्षात घेतलेत काय ? आणि इतरांच्या उणीवा मोजल्या आहेत का ?

मेकॉलेचे 'मिनट'.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 05/07/2018 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
(पुढील लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामुग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे आणि ते संदर्भ क्र.१, क्र.२ अशा प्रकारे दिलेले आहेत.) 'Macaulay's Minute' ही गोष्ट आपल्या सर्वांच्या साधारण माहितीची आहे. २ फेब्रुअरी १८३५ ह्या दिवशी मेकॉलेने एक टिपण लिहिले ज्याचे ह्या देशाच्या शिक्षणपद्धतीवर आणि पर्यायाने देशावर देशावर फार खोलवर आणि चिरस्थायी परिणाम झाले. त्या 'मिनट'ची पूर्वपीठिका आणि पार्श्वभूमि काय होती ह्याबद्दल फारशी महिती नसते, ती देणे हा ह्या लेखनामागील मर्यादित हेतु आहे.

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 02/07/2018 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा. भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. ब्रिटीश आपल्या भूमीत चालते झाले . पण त्यांनी आपल्या शिक्षणात आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्वानांमध्ये जी भारतीय संस्कृती बद्दल हीनत्वाच्या भावनांची बीजे पेरून ठेवली आहेत ती नष्ट होण्याची गोष्ट तर सोडाच पण आता त्याचा समृद्ध वृक्ष झाला आहे कि काय अशी शंका अनेक कारणामुळे येते. त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बालभारतीचे हे बारावीसाठी तयार केलेले मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक .

'व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर' कवितेचे अनुवाद

लेखक माहितगार यांनी शनिवार, 23/06/2018 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी अलिकडे मिपावर कितीसा पुरोगामी आहेस ? हि कविता लिहिली. :) (त्या कवितेची प्रेरणा विशीष्ट मिपाकर आहेत असे वाटण्याचा संभव आहे :), तसे खरे असण्यास हरकत नव्हती :) पण त्यांच्या दुर्दैवाने -ते दुर्दैवावर विश्वास ठेवत नसलेतरी आम्ही ठेवतो :) - त्या कवितेची तात्कालीक प्रेरणा अभारतीय आमेरीकन व्यक्तीचे अभारतीय विषयावरचे लेखन आहे :( ) कितीसा पुरोगामी आहेस ? कवितेस तुम्ही पुरोगाम्यांनाच का टार्गेट करता परंपरावाद्यांना का नाही असा एक तरी प्रतिसाद यावा अशी राहून राहून इच्छा होती.
काव्यरस

शंभर कौरवांची नावे.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 20/06/2018 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
कौरव १०० आणि पांडव ५ हे आपण सर्वजण जाणतो. ह्या सन्दर्भामध्ये युधिष्ठिराच्या तोंडचा हा श्लोक प्रसिद्ध आहे:
आपत्सु विग्रहे प्राप्ते वयं पञ्च च ते शतम् । परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ॥
(आमच्याआमच्यात संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाच आणि ते शंभर. पण कोणा परक्याशी संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाचासह शंभर.) अशा शंभर कौरवांपैकी दुर्योधन आणि दु:शासन सर्वांच्या परिचयाचे असतात.

माझे नेहरवायण ३

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 14/06/2018 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिय बद्दल पुर्नवाचन करत आहे . मागच्या लेखात नेहरुंच्या पडदा पद्धतीच्या विरोधात असलेल्या प्रागतिक विचारांची दखल घेतली. वस्तुतः भारतीय संस्कृतीच्या सकारात्मक बाजू विशेषतः भारतीय उपमहाद्विपातील विवीधतेतून एकता हे तत्व त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिया मधून जोरकसपणे मांडलेले आढळते. आणि हेच माझ्या या पुस्तकाबद्दलच्या आस्थेचे एक मुख्य कारण आहे.

मुस्लीम समाजातील पडदा पद्धती योग्य आहे काय ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 11/06/2018 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
You are not free if you feel the need to hide Burkha * Burqa-clad women prone to vitamin D deficiency: Doctors : Syed Mohammed TNN (टाईम्स ऑफ ईंडिया न्यूज नेटवर्क) Updated: Jun 7, 2013, 03:11 IST ** ' ड' जिवनसत्व विषयक अलिकडील कुमार यांचे चर्चा धा