दारु पुरती प्रतिभा याची केवळ मर्यादित,
रोज ढोसतो आणि होतो, चारीमुंड्या चित ॥१॥
कर्म दुविधेने तापुन हा झाला, पुरता संभ्रमित,
जना विचारतो कर्मफले हा चारीमुंड्या चित ॥२॥
सकाळी होती वांधे याचे, त्याचे गातो गीत,
हा खातो का पितो कळेना, चारीमुंड्या चित ॥३॥
वडा-पावच्या भंपक कविता, ना कोणी वाचित,
सुमार विडंबने पाडी त्याचू, चारीमुंड्या चित ॥४॥
र ला ट जुळवून करतो हा विषयांचे भरीत,
कसा निपजला थुकरट कवि हा चारीमुंड्या चित ॥५॥
किती मारल्यास उड्या तरी तुझी उंची मर्यादित,
घेशी कुणाशी होड रे फट्टू चारीमुंड्या चित ॥६॥