"आई आई ए आई अग बाहेर येना पटकन.. " दादा ओरडतच घरात शिरला. मी नेहमीसारखीच हॉलमध्ये बसले होते. "अरे काय झाले असे ओरडायला एकदम?" आई विचारतच बाहेर आली. "आई हा माझा मित्र .. अरे आत ये ना बाहेर का उभा आहेस असा?" दादा बाहेर डोकावत म्हणाला, दादाच्याच वयाचा एक देखणा रुबाबदार तरुण थोडासा लाजतच घरात शिरला. "आई हा अभिमन्यु, माझ्याच कॉलेज मध्ये शिकतो, आज सकाळी फिरुन येताना माझी आणी एका रिक्षावाल्याची टक्कर झाली जोरात, ती लोक दादागीरी करायला लागले, पण तेव्हड्यात हा अभी आला म्हणुन सुटलो बघ मी." "छोर ना यार" अभिमन्यु म्हणाला. बाप रे हा कोणी दुसर्या जातीतला आहे का काय ?