Skip to main content

साहित्यिक

मिनीची आई

लेखक नीधप यांनी गुरुवार, 05/02/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.

हा लेख मी माझ्या आईच्या, प्रा. माधवी पटवर्धन यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त (४ नोव्हेंबर २००८) लिहिला होता. पुणे लोकसत्ता मधे प्रसिद्ध झाला होता पण त्यांनी संपूर्ण न छापता शेवटचा काही भाग जागेअभावी गाळला होता. तस्मात पूर्ण लेख इथे लिहित आहे.
-----------------------------------------------

एक लेख

लेखक गोगोल यांनी गुरुवार, 01/01/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.

दूसर्यान्च्या ब्लॉग मधील लेख प्रसिद्ध करण्याबाबतीत काय नियम आहेत हे माहित नाही, पण हा लेख मला खुपच आवड़ला म्हणून खाली दुवा देत आहे.
नियम भंग होत असाल्यास कृपया कळवावे, मी हा धागा उड्वुन टाकिन.

https://shabd-pat.blogspot.com/2008/12/blog-post_3917.html

घरटे -२ : सत्यकथेवर आधारित!!

लेखक चेतन१२३प यांनी मंगळवार, 23/12/2008 22:43 या दिवशी प्रकाशित केले.

त्यावेळी मी नुकताच सायनरला राहायला आलो होतो. अंजली अजून पाळण्यात होती. नवीन बांधकामाचे व्रण अजून शिल्लक होते.
दिवाळीमध्ये रंगकाम केल्यामुळे येणाऱ्या एका वेगळ्याच सुगंधाची अनुभुती तेथे येत होती. नवीन वस्ती, नवीन लोक असल्यामुळे आमची अवस्था गोंधळल्यागत होती.

घरटे -१ : सत्यकथेवर आधारित!

लेखक चेतन१२३प यांनी सोमवार, 22/12/2008 23:41 या दिवशी प्रकाशित केले.

डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा! त्यातही लाडक्या सुनेच्या हातचा कडक, तजेलदार चहा आणि वर्तमानपत्र गॅलरीमध्ये अगदी हातामध्ये आणून मिळावे, म्हणजे माझ्यासारख्या भाद्रपदी विचार करणाऱ्या रिटायर्ड माणसाला स्वर्गसुखच म्हणा. किंबहुना त्याहूनही अधिक! तसा माझ्या सौच्या हातचा चहादेखील अगदी कडक असतो बरका! पण, सुनेच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "आदरणीयं श्वशुरम ।" ही भावना जाणवते तर आमच्या हिच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "हाताचा" कडकपणाच अधिक वाटतो.