Skip to main content

साहित्यिक

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 26/08/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.

वाचु आनंदे!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 23/08/2008 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
वाचन, माझ्या सर्वात आवडिच्या छंदांपैकी एक. तसे म्हणाल तर ट्रेकिंग, पेन्सिल स्केचेस, लिखाण हे माझे सर्वात आवडते छंद आहेत, खालोखाल टपाल तिकीटे गोळा करणे, संगीत ऐकणे, फोटोग्राफि, नाणी-नोटा जमवणे हे आणि असे अनेक छंद मला आहेत. एकेका छंदा बाबत थोडं थोडं लिहिन म्हणतोय. तर वाचन माझा आवडता छंद! किती वाचले या पेक्षा काय वाचले हे जास्त महत्वाचं असतं असं मला वाटतं. मुळात आपल्याला वाचता येतं हि भावनाच किती छान आहे?? मराठी-हिंदि-इंग्रजी तर आहेच पण तोडकं-मोडंक गुजराती पण मला वाचता येतं. कदाचित तुम्हाला वाटेल, वाचता येतं! यात काय विशेष? तर मग जे निरक्षर आहेत त्यांचा विचार करा. आणि मग त्यांनी कधी पु.ल.

बर्ट्रांड रसल, माझा सर्वात आवडता लेखक

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 21/08/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर> बर्ट्रांड रसल (Bertrand Russell) हा माझा सर्वात आवडता लेखक असल्यामुळे माझी मतं आत्यंतिक (चांगली) असण्याची शक्यता वाढते. मला संदर्भ म्हणून हा लेख लिहायचा नाही, तर फक्त एक ओझरती ओळख म्हणून! माहितीजालावर त्याच्याबद्दल खूप जास्त माहिती अर्थातच आहे आणि अनेक मिपाकरांना रसल आधीच माहित असेल. तर हा लेख त्यांच्यासाठी ज्यांना रसलबद्दल माहिती नाही, किंवा फक्त नावच ऐकून आहेत. थोडी माहिती या माणसाबद्दल आणि थोडी त्याच्या काही पुस्तकांबद्दल!

बाला आला रे

लेखक ब्रिटिश यांनी सोमवार, 04/08/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
जेआयला तुमा सगल्यन्चा लेखन वाचुन वाचुन मला बी वाटला कि आपन हेन्चेसारका काय तरी लिवला पायजे. म्हुन आपन ह्या साइटीवर लोगीन झाल्लो. पन लिवाचा काय ? परथम सग्ल्यन्ना नमस्कार. तर मन्डली मना काय तरि सूचुन दे मगे लिवतो. जल्ला टायपिन बी जमत नाय. पयल्यान्दाच लिवतोय काय तरी पर्तिसाद, मार्गदरशन देवा.

"रौशनी "

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 23/07/2008 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
बी रोमन इन रोम असे कुणीसे म्हंटले आहे. त्याचा अर्थ प्रत्येकजण आपआपल्या मकदुराप्रमाणे घेतो.माझ्या पुरता तरी तो आपले गाव सोडले की थोडे शिष्ठाचार बाजुला ठेवुन द्यावे. थोडे मोकळेढाकळे वागावे असा आहे. नव्या गावात जेथे कोणी आपल्याला ओळखत नाही तिथे थोडे वेगळे कपडे वापरले नेहमीचा कपड्यातला ईस्त्रीचा कडकपणा बाजुला ठेवुन झब्बा सलवार सारखा मोकळेपणा वागण्यात येतोच. अन्यथा एरव्ही अंबाडा दोनवेण्या तेल लावुन चापुनचोपुन असणारी काकुबाई हील स्टेशनला जीन्स घालुन बागडताना दिसली नसती. ही सगळी गणीते पुण्याला लागु होत नाहीत.

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 11/07/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले.

छंदोमयीतील भावनर्तन!

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 11/07/2008 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
'वादळवेल' या कुसुमाग्रजांच्या कविता छंदोमयी या काव्यसंग्रहात १९८२ मध्ये प्रसिद्ध झाल्या. यातील ८१ कविता नाशिकच्या परिसरातील पुण्यसलिला गोदावरीला त्यांनी अर्पण केल्या आहेत. रचनेच्या दृष्टीने या संग्रहात वैविध्यपूर्णता आली आहे, पण विषयाच्या दृष्टीने मात्र आधीच्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या वळणापेक्षा वेगळे वळण या कवितेने घेतले आहे अस मात्र दिसत नाही असे डॉ उषा देशमुख ह्यांनी म्हटले आहे. परंतु माझ्या मते येथे आत्ममग्न वृत्तीचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. कसाला लागला आहे येथे अंतस्थ वीणेचा विषण्ण सूर! आकाश व माती यांच्या नात्याचा शोध हा कुसुमाग्रजांच्या काव्यप्रतिभेला लागलेला छंद.