
| डॉ.आनंद यादव |
आमच्या औरंगाबाद शहरात काल, महाबळेश्वर येथे होणार्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्याक्षाची निवड होणार होती. आम्ही धावत-पळत मसापच्या (मराठवाडा साहित्य परिषद) कार्यालयात पोहचलो. गर्दी दिसली की डोकावून पाहण्याची सवय, त्यामुळे गर्दी झालेली होती. एकाला विचारले कोण ? तर तो म्हणाला डॉ.आनंद यादव ! डॉ. आनंद यादव विजयी झाले होते आणि त्यांची मुलाखत पत्रकार घेत होते. सायंकाळी मिपावर अभिनंदनाचा प्रस्ताव टाकू म्हटलं तर डोक्यात बजबज असल्यामुळे विसरुन गेलो. बरं इकडून तिकडून तयारी केली तर, कुठेच ते अध्यक्ष झाल्याची चर्चा /बातमी दिसेना. मनात विचार आला त्यांचे विरोधक कोर्टात गेले की काय ? ( दोन वेळेस अध्यक्षपदाने हुलकावणी दिली असल्यामुळे शंकाच शंका )पण तसे काही झाले नव्हते. आजच्या दैनिकात त्यांच्या संमेलनाध्याक्षांची बातमी वाचून पुन्हा आनंद वाटला. यावेळस आम्हाला दुहेरी आनंद झाला .एक ग्रामीण साहित्यचळवळीला प्रेरणा देणारा माणूस अभासासं चा अध्यक्ष झाला तर अभाविसासं च्या अध्यक्षपदी दलित साहित्याचे भाष्यकार डॉ. पानतावणे यांची निवड झाली. ग्रामीण आणि दलित साहित्याने एकमेकांच्या हातात हात घालून साहित्य प्रवासाचा मार्ग आखलेला असल्यामुळे या योगायोगाने अतिशय आनंद झाला.
ग्रामीण साहित्य लेखन करणार्या लेखकांची नावे घेतली की, जी काही नावं डोळ्यासमोर येतात त्यातलं एक नाव म्हणजे आनंद यादव.मराठीत कसदार ग्रामीण लेखन करणारे आणि ग्रामीण साहित्य चळवळीला गती देणारे एक मोठं नाव, आनंद यादव.
खेड्यात ग्रामीण साहित्याची व्यासपीठे निर्माण झाली पाहिजेत, तिथे नव्या प्रकाशन संस्था आणि साहित्यसंस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि ती काळाची गरज आहे, असा विचार त्यांनी सतत मांडला.
आनंद यादवांनी आपल्या लेखनाची सुरुवात 'हिरवे जग' (१९६०)पासून काव्यलेखनाने केली. पुढे त्यांनी कविता, कथा, व्यक्तिचित्रे, कादंबरी, ललित लेख, वगनाट्य, समीक्षा, असे सर्वच प्रकारचे लेखन केले, त्यांच्या लेखनाची वाटचाल आजतागायत चालू आहे. साठच्या दशकात त्यांनी काव्य आणि गद्य असे दोन्ही स्वरुपाचे लेखन केले. आपला अनुभव कवितेतून उत्तम व्यक्त होत नाही असे वाटल्यामुळे ते कथा,कादंबरीकडे वळले. आपल्या लेखनात प्रामुख्याने ग्रामीण अनुभवविश्व त्यांनी मांडला. या लेखनाबरोबर त्यांनी ग्रामीण साहित्याच्या स्वरुपाविषयी त्यांनी खूप चिंतन केले. नव्याने ग्रामीण लेखन करणार्यांना नव्या लेखकांना त्यांनी नेहमी मार्गदर्शन केले. त्यांच्या 'झोंबी' या आत्मचरित्रात्मक कादंबरीला साहित्य अकादमीचा (१९९०) पुरस्कार मिळाला. १९७५ नंतर त्यांनी सुरु केलेल्या ग्रामीण साहित्य चळवळीमुळे ग्रामीण साहित्याने एक नवी वाट चोखाळली असे म्हणावे लागेल.

| डॉ. आनंद यादव यांची पत्रकार परिषद |
ग्रामीण साहित्यात कथा,कादंबरीच्या निमित्ताने विचार मांडतांना खेडेगाव, तेथील जीवन,शेती, रीती, निसर्गाशी, मातीशी असलेला संबध. त्यांचे दु:ख,दारिद्र्य,चा सुक्ष्मरितीने अभ्यास करुन मानवी भावनांचा,भावविश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
डॉ. आनंद यादवांचे वैशिष्टे ज्याची नोंद मला महत्वाची वाटते की, त्यांच्या काळातील ग्रामीण कथा वाचतांना पात्रांचे संवाद बोलीतून व्यक्त होत होते, तर निवेदन प्रमाण मराठीतून व्यक्त होत होते, (लेखक निवेदनामधून बोलत होते) तेव्हा आनंद यादवांनी आपल्या ग्रामीण कथेत ग्रामीण माणूसच निवेदनाद्वारे बोलतांना वाचकांसमोर उभा केला.
ग्रामीण साहित्याच्या समीक्षेच्या निमित्ताने त्यांनी भारतीय खेड्यांचा आता विकास झाला आहे. तेव्हा त्याचा ग्रामीण आत्मा राहीलेला नाही. ग्रामीण भागाचे झपाट्याने झालेले शहरीकरण, नागर संस्कृती ग्रामीण माणसाच्या घरात घुसली आहे. शहरी आणि ग्रामीण दरी कदाचित उद्या उरणार नाही पण परिवर्तनाचा विचार करुनही ग्रामीण साहित्याचे मूल्य जरासेही कमी होणार नाही असे त्यांचे मत आहे.
डॉ. आनंद यादवांच्या ग्रामीण साहित्यचळवळीवर अनेकदा आक्षेपही घेण्यात आले. मराठा जातीची ही जातीयवादी चळवळ आहे, हे साहित्य क्षेत्रातले राजकारण आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी हे चालू आहे, वगैरे-वगैरे असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले. या सर्व आक्षेपांना त्यांनी 'ग्रामीणता: साहित्य आणि वास्तव ' या ग्रंथातून उत्तरे दिली आहेत.
सारांश : ग्रामीण साहित्य लेखन, सामाजिक जाणिवा, आणि बदलणार्या ग्रामीण साहित्याचा विचार करणारा एक मोठा लेखक म्हणून साहित्यविश्वाला त्यांची नोंद घ्यावीच लागलेली आहे. महाबळेश्वर इथे होणार्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. आनंद यादव यांचे मन:पूर्वक अभिनंदन !!!
डॉ. आनंद यादवांबद्दल विविध दैनिकामधून त्यांच्या साहित्याबद्दल खूप काही छापून आलं आहे. पण साहित्याचा वाचक म्हणून त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा आमचा स्वतंत्र प्रपंच !!!
अभिनंदन!
चांगली ओळख!
डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन..
जाहीर निषेध
In reply to जाहीर निषेध by स्वामि
हम्म !
In reply to हम्म ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मन आनंद आनंद धायो..
In reply to मन आनंद आनंद धायो.. by प्रदीप
असेच म्हणतो
In reply to मन आनंद आनंद धायो.. by प्रदीप
प्रदिपराव !!!
In reply to जाहीर निषेध by स्वामि
शरद
In reply to शरद by कोलबेर
+१
In reply to शरद by कोलबेर
आयला
In reply to आयला by विनायक प्रभू
त्यांना
In reply to त्यांना by कोलबेर
असो
http://maharashtratimes.india
In reply to http://maharashtratimes.india by सखाराम_गटणे™
चांगला दुवा !
डॉ. आनंद
शृंगारावर
In reply to शृंगारावर by गणा मास्तर
वाचायला पाहिजे...
अभिनंदन
In reply to अभिनंदन by अभिरत भिरभि-या
+१
फारच संमिश्र प्रतिसाद !
उत्तम पुस्तके
आणि नटरंग
झोंबी आणि घरभिंती वाचली आहेत