मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

रेल्वे भरती ची माहिती हवी.

कलंत्री ·
आज मी माझ्या एका सहकार्‍याशी ( तसा तो सिंधी आहे आणि गुजरात मध्ये पूर्वी नौकरी करीत असे) रेल्वे भरती कशी होते याबद्दल चर्चा करत होतो. त्या माहितीच्या आधारे हा लेख लिहित आहे. माझे समज ( याबद्दलच्या माहिती फक्त काही प्रांतातच येतात, त्या प्रांताच्या लोकांना वेगळी अशी वागणुक / सवलत मिळते, नेहमीप्रमाणे मराठी लोकाना डावलले जाते, अश्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात कधीच येत नाही, रेल्वे ही काय एका विशिष्ठ प्रातांचीच मक्तेदारी आहे काय? इत्यादी इत्यादी मी मुद्दे मांडले.) त्यावर त्याचे उत्तर मी मराठीत देत आहे -> अश्या परिक्षा देशातल्या वेगवेगळ्या भागात होत असतात.

एक महत्वाची सूचना...

विसोबा खेचर ·
मिसळपाव डॉट कॉमच्या (मिपा) सर्व सभासदांकरता एक महत्वाची सूचना - मिपावर राजकीय अथवा सामाजिक परिस्थितीबाबत लिहीताना प्रक्षोभक, भडकावु, भावना उत्तेजीत करणारे,चिथावणीखोर, कुणाला पर्सनली टार्गेट करणारे शब्द ( जसे की बिनडोक, मेंटल, गुलछबु, षंढ ) वापरणे कटाक्षाने टाळावे. कायद्याच्या भाषेत ह्या गोष्टी गुन्ह्याच्या कक्षेत येतात. ह्यासाठी आपल्यावर "अब्रुनुकसानीचा गुन्हा, भावना भडाकवल्याचा, चिथावणी दिल्याचा गुन्हा " दाखल होऊ शकतो. असे कुठलेही लेखन येथे आढळल्यास ते येथून त्वरीत उडवून लावले जाईल व संबंधित सदस्याचा आयडी व आयपी ऍड्रेस ब्लॉक केला जाईल.

वाचा आणि थंड बसा

भोचक ·
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

एक भारुन टाकणारा अनुभव .... शिवसेनेचा दसरा सोहळा !

छोटा डॉन ·
दिवस : रामाच्या रुपाने विश्वातल्या चांगल्या शक्तींनी रावणाच्या रुपातल्या वाईट, अमंगल शक्तींवर विजय मिळवुन आपल्या विजयी सेनेसह भारत भुमध्ये प्रवेश केला तो ... विजयादशमीचा ... स्थळ : आर्यांचा देश .... जर्मनी ! अजुन विस्तारात सांगायचे म्हटले तर माझ्या आस्थापनाचे कार्यालय ... वेळ : दुपारी १ वाजल्यानंतर संध्याकाळी ६ पर्यंत .... आज सकाळपासुनच खुप उत्साहात आहे, आजचा दिवस दसर्‍याचा, सण हा "आनंदाचा, मांगल्याचा, आप्तजनांना शुभेच्छा व आपट्याची पानेरुपी सोने" देण्याचा. अतिशय उत्साहात सर्वांना शुभेच्छा देऊन झाल्या व रुटीन कामाला सुरवात झाली.

रमज़ान व विजयादशमी निमित्ताने... राष्ट्रवादी मुस्लिमांचे कर्तव्य

शशिकांत ओक ·
रमज़ान व विजयादशमी निमित्ताने... राष्ट्रवादी मुस्लिमांचे कर्तव्य पुण्यातल्या राष्ट्रवादी मुसलमानांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांनी पुढाकार घेऊन अशा दुष्ट प्रवृत्तींना आळा घातला नाही तर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम राष्ट्रवादी मुसलमानांनाच भोगावे लागतील. मुस्लिम वस्त्यातून राष्ट्रविरोधी प्रचार केला जातो का? असा प्रचार करणारे कोण आहेत? त्यांना आधार देणारे कोण आहेत? यांची माहिती राष्ट्रवादी मुस्लिमांनी मिळवायला हवी देशातील अनेक घटनांचे धागेदोरे पुण्यात आढळलेले आहेत.

माझे सत्याचे प्रयोग

ऋषिकेश ·
टिपः सदर लेखातील हिरव्या रंगातील तिरपी अवतरणे मुस्त सारांश आहे. भाषांतर नाहि मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस पोरबंदरला आजच्या दिवशी जन्माला आला. पुढे हा मुलगा शिकला, आफ्रिकेला गेला. तिथल्या वंशभेदाबरोबर लढला, आफ्रिकेत प्रसिद्धी मिळवून जेव्हा हा माणूस भारतात परतला तेव्हाही भारत पारतंत्र्यातच होता. टिळकांच्या नसण्याने संपूर्ण भारताला एकत्र बांधणार्‍या नेत्याची कमी होती.

जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट

अभिजीत ·
जागतिक आर्थिक पेचप्रसंग आणि अरिष्ट गेले वर्षभर चालु असलेल्या जगभरातील आर्थिक घसरणमुळे अमेरिकेत आणि जगभरात दीर्घकालीन परिणाम घडतील यात आता काही शंका नाही. वाचकांसाठी हा एक धावता आढावा - २००३ पासुन विविध आर्थिक क्षेत्रात जगभरात तेजीला सुरुवात झाली. विकसित देश अधिक श्रीमंत होत होते आणि विकसनशील देशात मध्यमवर्ग वाढत होता. यामुळे आता सर्वत्र सुजलाम्-सुफलाम परिस्थिती येणार अशी खात्री अर्थतज्ञ, मोठमोठ्या बँकांमधे मोठमोठ्या पगारावर काम करणारे अधिकारी आणि सरकारी उच्चाधिकारी यांनी द्यायला सुरुवात केली होती.

काटा रुते कुणाला

अरुण मनोहर ·
लाचलुचपतीचे विडंबन..... काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे. मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? सांगू कसे कुणाला ते स्वच्छ शुभ्र बगळे चिरकाल चरणे त्यांचे, साहतात लोक सगळे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काही करू कसे मी? सारेच साव ठरले. भरतात पोतडी ते आडदांड बोके सगळे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? ह्या शर्मवंचितांना काटा कधी रुतेना पाहूनी लूटमारी मज बोच सलत आहे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे. मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे ........ रुते कुणाला?

विघ्नहर्त्यावरचे संकट टळणार?

सर्वसाक्षी ·
गणपती बाप्पा, ही बातमी खरी असेल तर तुम्हाला आमच्या उत्सवातली हजेरी संपवुन घरी जाताना काही अडचण येणार नाही असे वाटते.

नकटीच्या लग्नाला...

आपला अभिजित ·
बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं. वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते. आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती. नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं.