राजकारण
रंगपंचमी (उत्तरार्ध)
(पात्र व घटना काल्पनीक)
रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच.
इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून.
आपली बस
या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा.
सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात.
सदू : बस आली बस.
दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस!
(तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.)
दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे.
सदू : मग दुसर्या सीटवर बसु या का ?
दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे.
सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ?
दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्या आयांसाठी आहे.
अपयशाचे व्यवस्थापन
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे:
प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते?
डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो.
व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?
लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत.
राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही
(कट्टर मराठी) -इनोबा
शेजारचे जातियवाद व राजकारण
सध्याच्या युगात जातियवाद व राजकारण आजुनही ज्वलंत समस्या आहे. मी ऐक मध्यम वर्गीय नोकरधार असुन प्रामाणिक व सरळ साधा व दुसर्यास उपयोगी पडनारी व्यक्ती आहे. मी मागासवर्गीय असुन शेजारच्या स्त्रीया आमच्या स्त्रीयांच्या बरोबर अंतकरनापासुन व्यवस्तीत वागत नाहीत. हे जहाले स्त्रीयांचे. पुरषांचे कही कमी नाही. इतर कोनत्याही गोष्टीत आडकाठी घालुन आम्हाला खाली खेचतात. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार.
घरवाले...बाहरवाले
कृपया हे वाचा..
इच्छुकांनी या विषयावर आपापली मते नोंदवावीत व चर्चा करावी असा मानस आहे...
शिक्षक दिन
हि कविता मी संकलीत केलेली आहे.मुळ कवीची माहिती कवितेखाली दिली आहे.
पाच सप्टेंबर दिन उजाडला
जाऊ सत्काराला शिक्षकांच्या
शाळा रंगवली हार मागविले
गळ्यात घातले पुढार्यांच्या.
करूनिया स्मित स्वारी पुढे आली
भाषणास केली सुरुवात
तास सव्वातास भाषण सुंदर
दारुबंदीवर त्यांनी केले.
त्यांच्या पाठोपाठ दुजा उठे कोणी
गरिबीचा त्यांनी नारा दिला.
गरिबांच्या पाठी म्हणे कोण आहे
शल्य बोचते हे अंतरात
तसेच दाबून धरून हृदय
संपवी वक्तव्य दीनांसाठी.
शेवटी म्हणाले अध्यक्ष सन्मान्य
केले उपकृत बोलावून.
आम्हावरी लोभ ठेवावा असाच
पुढल्या खेपेस येऊ खास.
शिक्षक दिनाचा ऐसा सोहळा
भ्रमाचा भोपळा नित्य हाती!
कविता संग्रहः शब्द मना
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
