मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काटा रुते कुणाला

अरुण मनोहर · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
लाचलुचपतीचे विडंबन..... काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे. मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? सांगू कसे कुणाला ते स्वच्छ शुभ्र बगळे चिरकाल चरणे त्यांचे, साहतात लोक सगळे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काही करू कसे मी? सारेच साव ठरले. भरतात पोतडी ते आडदांड बोके सगळे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? ह्या शर्मवंचितांना काटा कधी रुतेना पाहूनी लूटमारी मज बोच सलत आहे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? काटा रुते कुणाला? चरबीच जाड आहे. मज "फ़ूल" हे समजती, हा कृरभाग आहे ........ रुते कुणाला? काटा रुते कुणाला?

वाचन 2465 वाचनखूण प्रतिक्रिया 3

सर्किट Wed, 09/17/2008 - 10:47
मस्त ! -- (वकील) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)