मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

एकाकी वाट

अरुण मनोहर ·
काव्यरस
एकाकी वाट वाट चालतो चालतो दूर पळते क्षितीज चांदण्या विझलेल्या, नेत्री थबकली नीज बोचे अचानक खोल तुझ्या मायेचा पाखर पिसाटले पळतांना लागे तीच ती ठोकर भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर पण सारतो पोटात दाम मोजून जहर कुठे वाटेत गळाली एका उदराची नाती चेचून तोडली भिंती विटांच्या आघाती झुले बाजुला पारंब्या, आपापले गीत गाती पालेमुळे गुंतलेली, येई कुणीही ना हाती त्यांच्या झावळी मिटल्या माझे बोडके आकाश फ़ुका बागेत सावली, शोधे जीव कासावीस वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट ****************

मेमांडू--एक अनुभव.

स्वप्ना हसमनीस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
येथे मलेशियात 'मेमांडू' म्हणजे ड्रायव्हिंग,मोटारचालकत्व.भारतात असताना आपण गाडी चालवावी,त्याचा निदान परवाना तरी आपल्याकडे असावा असे मला मनापासून कधीच वाटले नव्हते.उलट नवर्‍याने गाडी चालवावी आणि आपण शेजारच्या सीटवर बसून खुशाल त्याच्या ड्रायव्हिंगवर ताशेरे ओढावेत्,जमल्यास एखादी डुलकी काढावी एवढाच काय तो प्रवासात माझा सहभाग असे.पण इथे मलेशियात आल्यावर मात्र माझी पंचाईतच झाली.पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्रास नसल्यामुळे सारखेच गाडीसाठी दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागे आणि दुसरे म्हणजे माझ्याहून वयाने लहान स्त्रिया मोठ्मोठ्या गाड्या सहजपणे चालवितात हे पाहून मला एक प्रकारचा न्यूनगंड येऊ लागला.आता आपणही कांहीत

क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय

विकास ·
कधी काळी वृत्तपत्रातील बातमीवरून बोलत असताना, एका सन्माननीय व्यक्तीने मला एकदा मिष्कील उपदेश केला होता, "जर काही सामाजीक काम करायचे असेल तर, शहाणा हो आणि वृत्तपत्रे वाचणे बंद कर!"अर्थात उपदेश खरा होता जरी त्यातील हे वाक्य मिष्कील असले तरी... तर "वृत्तपत्रे वाचणे बंद कर" या वाक्याचा अर्थ काय? बातम्या म्हणून वाचायला लागले की खून, मारामार्‍या, भ्रष्टाचार, लबाड जोडती इमले माड्या-गुणवंतांना मात्र झोपड्या, असेच पहायला मिळते. यातून एखाद्या वेळेस चीड येईल पण एकंदरीत नैराश्यानेच ग्रासले जाते ज्यातून इतरांसाठीचे काय, स्वतःचे पण धड काम होत नाही.

तुमचीही कोणीतरी वाट पाहत आहे.....

भानस ·
लेखनप्रकार
आजी गेली तेव्हा मी अमेरिकेत होते. १३ जानेवारी,२००१-भोगीचा दिवस. सकाळी मुलगा आणि नवरा आपापले डबे घेऊन गेले. घरातले आवरत एकीकडे मी मेल पहात होते. सासूबाईंचा मेल होता. दुःखद निधन. मी घाईघाईने मेल पाहिला, " अरे देवा!!" आजी गेली होती. बराच वेळ मला काहीच समजत नव्हते. रडूही येत नव्हते. हे खरे आहे ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. आजही बसत नाही. मी आईला फोन लावला. आईने सांगितले की फारसा त्रास न होता आजी गेली. तीन-चार तास हॉस्पिटल मध्ये होती. बोलतही होती. अटॅक आला होता. डॉक्टरांनाच सांगत होती, मला काही कुठे दुखत नाही. लवकर घरी पाठवा. पुन्हा एक अटॅक आला आणि गेली. आजोबा गेले त्यावेळी मी तशी लहानच होते.

न्युयॉर्क

प्रभो ·
लेखनप्रकार
"भे**...मी NY ला येतोय या थँक्सगिविंगच्या सुट्टीला.....आयेगा नं तू मिलने???" ऑफिसमधला एक जुना मित्र जो आता दुसर्‍या कंपनीत आहे तो जीमेलवर बोलत होता. शेवटची भेट झालेली दीड वर्षापूर्वी....त्याच्या अमेरिकेला जाणार म्हणून दिलेल्या पार्टीला... ईकडे रूमपार्टनर्स आणी बाकिच्या मित्रांचा वॉशिंग्टन डी सी आणी अटलांटीक सिटी ला जायचा प्लान फिसकटला.. म्हणून मग न्युयॉर्क ला जायचं ठरवलं..आधीचा विकांत पण एका मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी न्युयॉर्कची नाईट लाईफ हुंगण्यात गेला होता. यावेळेस काही प्रसिध्द ठिकाणं पाहण्याचे ठरवले.. थँक्सगिविंग डे ला न्युयॉर्कचे एक आकर्षण असते ते म्हणजे मेसीची थँक्सगिविंग डे परेड.

तू तर माझी बायको, शारदा.....

भानस ·
लेखनप्रकार
गेल्या वर्षी पुण्याला सासूबाईकडे गेले होते. एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या सुंदर मोठ्या बागेत-क्लबहॉऊस मध्ये फिरत होते. बरेच ज्येष्ठ नागरिक एका गोल टेबलाभोवती बसून ब्रिज, पोकर खेळत होते. टेबल टेनिस भोवती तर खूपच गर्दी होती. अगदी लहान मुले जसे ओरडाआरडा करत खेळतात तसेच दृश्य होते. काही आज्या साड्या खोचून तर काही पंजाबी ड्रेसमध्ये ..... काही आजोबा अगदी इरेला पेटून जिंकायचेच असे खेळत होते. दोघेतिघे तरणतलावामध्ये थोडावेळ व्यायाम करून आभाळाकडे पाहत रिलॅक्स तरंगत पडून होते. एका कोपऱ्यात कॅरमचा अड्डा जमला होता. चौघेजण अटीतटीचा सामना लढत होते.

प्रिझनर्स डिलेमा

अजय भागवत ·
मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू. "प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू. गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात.

ढुंढो ढुंढो रे साजना, तशात दुपटीची भर.......

भानस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अरुंधती आज नेहमीपेक्षा जरा लवकरच उठली. सेक्शनचे हळदीकुंकू होते. नेहमीचा तो पंजाबी नको बाई, आज जरा साडी नेसीन. मनासारखे आवरून निघायचे तर घरातली कामे आवरून स्वतःसाठी अर्धा तास तरी हवाच ना. आयत्यावेळी काहीतरी उदभवते म्हणून अजून थोडा वेळ असू दे हाताशी म्हणून अजूनच लवकर उठून आवरायला सुरवात केली. डबेडुबे झाले. बाईही वेळेवर आली. लेकीची रिक्षाही आज पाच मिनिटे लवकरच आली. नवऱ्याला आज नेमके उलट दिशेला जायचे असल्याने रिक्षा घ्यावी लागेल एवढाच काय तो घोळ होता. पण त्याची फार चिंता नको करायला. रोज तर पाहतो आपण खाली उभ्याच असतात रिक्षा.

असा अनुभव यावा म्हणूनच का?

वेदश्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हॅलो, गावात गडबड आहे. लवकर नीघ घरी जायला.." आईचा फोन आला तेव्हा हातातले काम अर्धे झाले होते. ते पुरते आवरेतो जवळपास ऑफिसातल्या सर्वांनाच असे तातडीचे निरोप आले होते. अशा गोष्टी काय रोजच्याच झाल्या आहेत असे वाटून मी नेहमीप्रमाणे ऑफिसातले काम आटपून माझ्या अ‍ॅक्टीव्हावरून घरी जायला निघाले. रस्त्यावर नेहमी यावेळेला ट्रॅफिक खूपच असतो पण आज तोबा ट्रॅफिक तर होतेच पण मुख्य म्हणजे ते जबरदस्त तुंबलेले होते. जवळपास अर्धा-पाऊण तास काहीच हालचाल झाली नाही मग पोलिसांची गाडी आली आणि काहितरी सारवासारव होऊन ट्रॅफिक वाहते केले गेले.