Skip to main content

राहणी

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 10/08/2010 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे.

माझा खाद्यप्रवास

लेखक दिनेश यांनी गुरुवार, 05/08/2010 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम (जुने आणि नविन) मिपाकरहो, आम्ही बिल्ला नंबर १६. मिपा सुरू झाल्यापासून आम्ही तसे वाचनमात्रच, कधीतरी प्रतिसादांच्या एखाददोन पिंका टा़कणारे, अन्यथा झाडावर बसून पॉपकॉर्नची पोती आणि कोकची पिंपे रिचवण्यात, खरडवह्या चघळण्यात आणि कधीमधी व्यनिमनीच्या गोष्टी करण्यात आम्हाला रस! पण गेल्या काही दिवसातले धागे वाचताना मचाणच बांधून बसायची वेळ आली आणि त्यामुळेच आमची कैफियत आपणासमोर आणण्यास आम्ही उद्युक्त झालो. (हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने चु भू द्या घ्या) आम्ही जन्माने आणि कर्मानेही मुंबईकरच. चारचौघांसारखेच आमचेही बालपण होते पण एक मोठ्ठा फरक म्हणजे आमच्या घरात गाई म्हशी होत्या.

घरातील ज्येष्ठ व्यक्ती

लेखक शुचि यांनी मंगळवार, 03/08/2010 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारची गोष्ट आहे. १० वर्षाच्या माझ्या मुलीची मैत्रिण आमच्याकडे माझ्या मुलीशी खेळायला म्हणून आली होती. आई म्हणजे माझ्या सासूबाई नेहेमीप्रमाणे लोकरीचा स्वेटर वीणत बसल्या होत्या. या चिमुरडीचा आल्या आल्या चिवचिवाट सुरु झाला. तिनी आल्या आल्या स्वेटरचं कौतुक केलं, तो शिकून घेण्यात रस दाखवला. आई फक्त शांतपणे म्हणाल्या "बघ, म्हणजे येईल." : ) आणि वीणू लागल्या. मैत्रिणीचा उत्साह बघून आमच्या पिल्लाला कंठ फुटला नसेल तर नवल - "आज्जी खूप छान वीणते. तिनी ऑलरेडी अर्धा स्वेटर वीणला आहे. ती मला शिकवणार आहे" मला ते सगळं ऐकून खूप लाज वाटली.

हनी बंचेस ऑफ ओट्स!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 31/07/2010 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याच्या सीरिअल्सचे दोन रिकामे, जुने बॉक्सेस हे माझा अतिशय मौल्यवान ठेवा आहे हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. १९९९ साली जेव्हा मी भारतातून मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीत अमेरिकेकडे यायला निघालो तेव्हा माझ्या खिशात पहिल्या सत्राच्या फीला पुरतील इतके $९३०० चे प्रवासी चेक्स होते. माझ्या शिक्षणाकरता आमच्या घरावर कर्ज काढायची तयारी माझ्या वडिलांनी चालवलीच होती परंतु माझ्या मनात मात्र माझ्या शिक्षणासाठी घरच्यांवर हा कर्जाचा डोंगर नको हे ठाम होते! पुढची चार वर्षे मी सफाई कामगाराचा मदतनीस ते प्रयोगशाळेतला असिस्टंट अशी सर्व प्रकारची कामे केली.

पिण्याचे पाणी -एक समस्या

लेखक बद्दु यांनी गुरुवार, 29/07/2010 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या पाण्यावरून धुमशान सुरू आहे. नळाचे पाणी (टॅप वाटर) विरुद्ध बाटलीबंद पाणी . आमच्या इकडे (आखाती वाळवंटात) बाटलीबंद पाण्याचा जास्त वापर आहे. त्यातही काही जणांनी घरी पाणी शुद्ध करण्याचे महागडे (किंमत सुमारे ३५,००० रुपये) यंत्र (वाटर प्युरिफायर)लावले आहे. त्यांचे म्हणणे हे की बाटलीबंद पाण्यापेक्षा असे शुद्ध केलेले पाणी आरोग्यास जास्त चांगले. कारण त्यातील विरघळलेले क्षार ( टी. डी. एस. – Total Dissolved Solids) चे प्रमाण बाटलीबंद पाण्यापेक्षा कमी आहे. प्रत्यक्षात WHO च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे टी. डी. एस. चे प्रमाण ५०० मिलि प्रती १००० लिटर (500 ppm) असायला हरकत नाही.

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 29/07/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

मी अनुभवलेली अमेरीका

लेखक शुचि यांनी बुधवार, 28/07/2010 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंचा अनुभव त्यांच्या शब्दात - अमेरीकेत प्रवेश म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळण्यापेक्षादेखील कठीण हे आजूबाजूंचांकडून ऐकून होते पण याचा साक्षात अनुभव आला काही एक वर्षांपूर्वी. कॉन्सुलेट्च्या फेर्‍या आणि त्यांचे १७६० फॉर्म्स भरता भरता नाकी नऊ आले होते, जीव मेटाकुटीला आला होता. दर वेळेस कॉन्सुलेटला जाते वेळी सिद्धीविनायकाचं दर्शन घडत असे आणि बाप्पाची आळवणी पण तो सोनियाचा दिनु काही उगवत नव्हता. आपल्या इंडीयन लोकांना तुमचा मुलगा जर "आय टी" मधे असेल आणि अमेरीकेत असेल तर व्हिसा मिळणं बरच सुकर होतं.

बाय

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/07/2010 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंनी लिहीलेला त्यांच्या शब्दातील हा लेख - आजकाल खूपदा वेडं मन मागे मागे जातं आणि व्याकूळ आठवण येते ती बालपणीचा रम्य काळ घलवलेल्या वसई तालुक्यातल्या विरार गावाची. हळूहळू धूसर असं एक चौसोपी घर दिसू लागतं, पुढे मागे अंगण असलेलं. घराला मागे पडवी तर रांगोळीसाठी पुढे मोठ्ठा ओटा.परसदारी आम्हा मुलांसाठी करकर आवाज करणारा, साखळ्या-साखळ्यांचा भला थोरला झोपाळा. लहानपणी तर हा झोपाळा फारच प्रशस्त भासे. अंगणभर तगर, प्राजक्त, जाई-जुई, जास्वंद याव्यतिरीक्त आंबा, पेरू, चिक्कू,पपनस, जांभूळ, करवंद. मग काय मे महीन्यात आम्हा मुलांची मज्जाच मज्जा.

आमच्यावेळी नव्हती असली थेरं!

लेखक रेवती यांनी सोमवार, 26/07/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, काय गं झालं? ही का रडतीये?" हा प्रश्न माझ्या आईनं तिच्या आईला केला होता. सुट्टीत मामा मामींकडे गेलं की आजीच्या तक्रारी सुरु होत असत. तिचं आपलं ठरलेलं वाक्य,"आमच्या वेळी नव्हती बाई असली थेरं!" प्रसंग म्हटला तर साधासाच होता. दर रविवारी मला आणि मामेबहिणींना न्हाऊ माखू घालण्याचा तिचा हट्ट असे. भल्या सकाळी आमच्या सुपीक डोक्यांना कोमट तेल लावून ठेवायची, मग तिच्याकडे असलेल्या पितळ्याच्या तपेलीत घरी तयार केलेली शिकेकाई भिजवून उकळून त्याचं चोथा पाणी वेगळं करायची. शिकेकाईही साधीसुधी नसायची. त्यात संत्र्याच्या वाळवलेल्या साली, रिठे आणि काय काय बरेच जिन्नस असायचे.