न्युयॉर्क
"भे**...मी NY ला येतोय या थँक्सगिविंगच्या सुट्टीला.....आयेगा नं तू मिलने???"
ऑफिसमधला एक जुना मित्र जो आता दुसर्या कंपनीत आहे तो जीमेलवर बोलत होता. शेवटची भेट झालेली दीड वर्षापूर्वी....त्याच्या अमेरिकेला जाणार म्हणून दिलेल्या पार्टीला...
ईकडे रूमपार्टनर्स आणी बाकिच्या मित्रांचा वॉशिंग्टन डी सी आणी अटलांटीक सिटी ला जायचा प्लान फिसकटला..
म्हणून मग न्युयॉर्क ला जायचं ठरवलं..आधीचा विकांत पण एका मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी न्युयॉर्कची नाईट लाईफ हुंगण्यात गेला होता. यावेळेस काही प्रसिध्द ठिकाणं पाहण्याचे ठरवले..
थँक्सगिविंग डे ला न्युयॉर्कचे एक आकर्षण असते ते म्हणजे मेसीची थँक्सगिविंग डे परेड. ही परेड दरवर्षी मेसी नावाचे एक भलेमोठे डिपार्टमेंटल स्टोअर भरवते. ह्या परेडला ८५ वर्षांचा इतिहास आहे आणी ही अमेरिकेतली सर्वात जुनी दोन नंबरची थँक्सगिविंग डे परेड आहे.
न्युयॉर्कला जाणासाठी मी आदल्या दिवशीच मावसभावाकडे न्युजर्सी ला जाउन राहिलो..तिकडून मेट्रोने प्रवास करुन न्युयॉर्कच्या ३४व्या रस्त्यावरच्या जगप्रसिध्द Penn(Pennsylvania) स्टेशन वर उतरलो. ह्या स्टेशनच्या वर जगप्रसिध्द असा मॅडिसन स्केअर गार्डन अरिना आहे. इथे बास्केटबॉल, बॉक्सिंग ई. चे सामने होत असतात. हे असे ठिकाण आहे कि जेथे जिवंत रेल्वे रूळांवर जगातला सर्वात मोठा शॉपिंग मॉल आणी मैदान आहे.
त्याच चौकातून दिसणारी ही कधीकाळची जगातील सगळ्यात उंच इमारत...एंपायर स्टेट बिल्डींग..
मग आम्ही चालत परेड पहायला निघालो....
या परेड मधे १५०० नर्तक, चीअरलीडर्स, गायक यांनी भाग घेतला होता. लहान मुलांसाठी आकर्षण म्हणून १५ भलेमोठे कार्टून फुगेही होते.
यावर्षीचे काही फुगे होते Sailor Mickey, Ronald McDonald, Spiderman आणी Pillsbury Doughboy.
परेड संपल्यावर पावले वळली सरवाणा भवन कडे...तिथे मस्त असा डोसा, घी पोंगल, साउथ इंडियन थाळी खाउन, ताक पिउन मन तृप्त केले.
आता वेध लागले ते सेंट्रल पार्कचे...आपल्या राजीव गांधी नॅशनल पार्क प्रमाणेच हे एक मॅनहॅटन मधील एक खुप मोठे पार्क आहे...इथे जाण्यात एक आतला हेतू होता की पार्कमधे एखादा रिकामा बेंच पाहून मस्तपैकी ताणून द्यायची.
पुढील भागात - वॉल स्ट्रीट, सॅटन आयलंड फेरीवरून बराचसा जवळून दिसणारा लिबर्टी बाईचा पुतळा , चार्गिंग बुल याबद्दल.
वाचन
4905
प्रतिक्रिया
24