मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकाकी वाट

अरुण मनोहर · · जे न देखे रवी...
काव्यरस
एकाकी वाट वाट चालतो चालतो दूर पळते क्षितीज चांदण्या विझलेल्या, नेत्री थबकली नीज बोचे अचानक खोल तुझ्या मायेचा पाखर पिसाटले पळतांना लागे तीच ती ठोकर भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर पण सारतो पोटात दाम मोजून जहर कुठे वाटेत गळाली एका उदराची नाती चेचून तोडली भिंती विटांच्या आघाती झुले बाजुला पारंब्या, आपापले गीत गाती पालेमुळे गुंतलेली, येई कुणीही ना हाती त्यांच्या झावळी मिटल्या माझे बोडके आकाश फ़ुका बागेत सावली, शोधे जीव कासावीस वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट ******************************

वाचने 2383 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्राजु 20/12/2009 - 05:51
वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे छान आहे. - प्राजक्ता http://www.praaju.com/

मदनबाण 20/12/2009 - 08:50
जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट सुंदर... (यात्री) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

jaypal 20/12/2009 - 11:20
"भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर पण सारतो पोटात दाम मोजून जहर "...............मला आवडल. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 20/12/2009 - 12:20
आवडली कविता -दिलीप बिरुटे

चन्द्रशेखर गोखले 20/12/2009 - 20:32
उशिरा वाचली , खूप खूप आवडली.

३_१४ विक्षिप्त अदिती 22/12/2009 - 09:09
आता तशी जुनी कल्पना; पण कवितेची मांडणी आणि शब्दांची निवड आवडली. अदिती

पाषाणभेद 22/12/2009 - 09:23
उत्तम काव्य. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी