मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

निसर्गाचा हिशोब

अरुंधती ·
लेखनप्रकार
आज वाळ्याच्या पडद्यांना पाणी घालताना सहज खिडकीतून बाहेर पाहिले. शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले होते. खिडकीच्या खाली, वळचणीच्या जागी पारव्याच्या मादीने दोन अंडी घातली होती. म्हणूनच आज सकाळपासून त्यांची खिडकीपाशी लगबग चालली होती तर! एवढे दिवस त्यांना रोज खिडकीपासून हुसकावून लावता लावता मीच जिकिरीला आले होते. त्यांचे ते खर्जातले घुमणे, पंखांची फडफड आणि खिडकीत केलेली घाण ह्यांपेक्षाही मला त्यांना तिथे आपला संसार थाटू द्यायचा नव्हता.

माझी व लाखों-करोडोंची लाईफलाईन......

भानस ·
लेखनप्रकार
तिला प्रथम कधी बरं पाहिलं होतं मी...... आई सांगते त्यानुसार जेमतेम वर्षाची असेन. दादर ते अंधेरी हा नेहमीचा प्रवास. मामा अंधेरीला राहायचा नं. तेव्हांपासून ती माझी व मी तिची झालेली. गेल्या जन्माचे माहीत नाही पण या जन्माचे ऋणानुबंध नक्कीच होते. आम्ही ठाण्याला शिफ्ट होऊन दोन-तीनच महिने झाले होते. स्कूटर स्टॅंडला लावतानाच ८.५३ आज तिनावर येतेय हे ऐकताच मी नवऱ्याला टाटा करून पळत सुटले. ब्रिजवरून उतरतानाच लोकल आलीही त्यामुळे रोजचा डबा सोडाच पण पुढचा फस्टही गाठणे केवळ अशक्य असल्याने समोरच असलेला महिलांचा सेकंडचा डबा चटदिशी पकडला. दहा सेकंदाच्या चलबिचलीमुळे इतके जीव खाऊन धावूनही माझी गाडी सुटणार होती.

दंतविहीनांचे दाताळ अनुभव

अरुंधती ·
लेखनविषय:
(खालील लेख मी बर्‍याच महिन्यांपूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आज मिपाकरांसाठी इथे देत आहे. प्रस्तुत लेखात कोणाची खिल्ली, थट्टा उडवण्याचा मानस नसून आयुष्यातील एका अटळ सत्याकडे विनोदी चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न केला आहे! :D ) आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे?

(ऐक माझ्या मुला)

राजेश घासकडवी ·
प्रेरणा, अर्थातच ही कविता. ऐक माझ्या मुला, तू जरा, तू जरा गोंधळी, या घरी, शांतता दे जरा उच्च वाणी तुझी रे पिपाण्यापरी बोंबलूनी तु घेशी शिरी या घरा पीरपीऱ्या म्हणू, की म्हणू कट्कट्या त्रास देशी असा उठ्विशी मत्शिरा!! तू हि शाई कशा भिंतिला लावली बर्बटूनी निघे, रंग हा पांढरा टाकुनी फेकुनी वस्तु सर्वाघरी फोडशी आरसा मारुनी पत्थरा कोडगा हासतो निर्लजा कारट्या दांडगा, उंडगा.. तू कसा माजरा झोप की क्षण्भरी श्वास घेतो जरा ऐक माझ्या मुला, ऐक ना तू जरा काय साहू पुता, अंत आला अता दे दया तू मला, जोडतो मी करा -राजेश वाचवा वाचवा वाचवा वाचवा

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

बेसनलाडू ·
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

मजेमजेशीर हँगओव्हर निवारण उपाय!

अरुंधती ·
लेखनप्रकार
मिपा वर पार्टी रे पार्टी पाहिल्यावर माझ्या मनात विचार सुरु झाले..... बिच्चारे पार्टीजीव!!! :S आधी पार्टी पार्टी करत ढोस ढोस ढोसतील आणि दुसर्‍या दिवशी डोकं धरून बसतील. मग दुखर्‍या डोक्यानं घरात बायको, पोरं, हापिसात हाताखालचे लोक आणि सहकारी ह्या सर्वांवर चिडचिडाट करतील.... सर्वांचाच दिवस खराब होऊन जाईल!!! : हँगओव्हर हा प्रकार टाळता येऊ शकतो असा सल्ला/ मत अनेक आहारतज्ञ व डॉक्टर्स प्रदर्शित करतात. त्याचे गमक तुम्ही मद्यपानाच्या अगोदर खाणे, मद्यपानादरम्यान पाणी पीत राहणे व मद्यपानानंतर काही ठराविक पथ्ये पाळणे [उदा.

पहिलं प्रेमपत्र

अरुंधती ·
लेखनविषय:
आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेमपत्र लिहायचं होतं..... मनात खूप धाकधूक वाटत होती.... छातीचे ठोके वाढायचे, तळहात घामेजायचे....सर्व नर्व्हस असण्याची लक्षणे उफाळून यायची! काय करणार?

उन्हाळ्याची तयारी

अरुंधती ·
उन्हाळा आला की आमची दरवर्षीप्रमाणे 'उन्हाळ्याची बेगमी' सुरु होते. म्हणजे सर्व जाडजूड पांघरुणे, दुलया ह्यांना माळा दाखवायचा आणि त्या जागी डोळ्यांना शांत करणार्‍या रंगांच्या स्वच्छ सुती, तलम चादरी, पडदे वगैरे लावायचे. कूलरची साफसफाई करून ठेवायची! ठुमकत ठुमकत कुंभारवाड्यातून चांगल्यापैकी माठ आणायचा आणि त्याला दोन तीन दिवस आधी पाण्यात, मग उन्हात असे आलटून पालटून ठेवायचे.... त्याला तिपाईवर ठेवून त्यात पाणी भरायचे, वाळ्याची जुडी घालायची, ओले फडके बाहेरून गुंडाळायचे आणि थंडगार पाण्याच्या चवदार आस्वादाला सज्ज व्हायचे!

सावध ऐका (मागल्या) हाका!

भोचक ·
पदार्थाची चव लिहून सांगता येत नाही, तो अनुभवाचा भाग आहे, तद्वतः इंदूरी हाकांचे विश्व हा खास अनुभवाचाच भाग आहे. आता लेखाची सुरवातच खाद्यपदार्थाच्या शब्दाने व्हावी हा खास इंदुरी असल्याचा अपरिहार्य नि अटळ परिणाम आहे. पण तो अट्टल खवय्या असल्याची साक्षही आहे. इंदुरात आल्यावरही इथल्या हाकांमध्ये भिजले नाहीत नि त्या हाका तुमच्या जिभेत भिजल्या नाहीत, तर तुम्ही 'इंदौरकर' कधीच होऊ शकणार नाही. इथल्या भय्याचा उच्चार तुम्ही कोणत्या वेळी, कोणासमोर नि कसा करता यावरही तुम्ही इंदौरी आहात की नाही हे ठरते.