Skip to main content

प्रेमकाव्य

बकूळ फूले

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ओन्जळितल्या बकूळ फुलांना ओन्जळित तूझ्या धरशील का? या बकूळ फुलांचा मधूगंध मजला सांग प्रीया तू देशील का? ओन्जळितल्या त्या बकुळ फुलांना पापणीत तूझ्या ठेवशील का? पापणीतून अलगद त्यांना मनात सामावून घेशील का? अखेपर्यंत आठवणीने मनात तू जपशील का? सूखलेल्या निर्माल्यवत त्या फुलांना ओन्जळित पून्हा धरशील का? या बकूळ फुलांचा मधूगंध मजला पून्हा प्रीया तू देशील का?

उन्मुक्त

लेखक जयवी यांनी गुरुवार, 29/01/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
देहफुले उमलवून मुक्त तू उन्मुक्त तू तुफानी प्रीत सरी उधळूनी रिक्त तू झेलूनी तुझा प्रपात नखशिखान्त नाहते प्रणयाचा मी मरंद मनमुराद चाखते दाहक कोसळ तुझा उतरतो नसानसात मदहोशी पसरते गात्रातून अंतरात वितळते मिठीत मुग्ध बेहोषी धुंद धुंद उन्मेषी श्वासांची लयकारी मंद मंद जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

फक्त तुझा ....!!!!

लेखक डोम्बिवली फास्ट यांनी शनिवार, 17/01/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
:X झोप माझी असली तरी, स्वप्न मात्र तुझीच आहेत... (|: , श्ब्द माझे असले तरी, सार्मथ्य मात्र तुझेच आहे......., :H सुर माझे असतील तरी, गीत मात्र तुझेच आहे.......... :P , प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाच आहे..........., :''( प्रेम माझे असले जरी तुजवर, सुग॑ध मात्र तुझाच आहे................ =P~ , वेडा मी असलो तरी, वेड मात्र तुझेच आहे......... :''( !!!!!!!!!!! - =(( फक्त तुझाच वेड प्रियकर.
Taxonomy upgrade extras

" गजरा "

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 10/01/2009 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नात येऊन माझ्या रंगतो आणि पापण्यावर भिरभिरतो " गजरा " माझे गीत घेऊनी ओठात तुझ्या केसात शिरतो " गजरा " तुझ्या भावना, तुझे दु:ख न विचारता मज सांगतो " गजरा " तुझेच स्वप्न या जीवनात मला सखे, देतो हा " गजरा " आकाशातल्या चांदण्यासम तुझ्या केसात वाटतो " गजरा " पूजा करावी जशी रतीची तसा तुज मी वाहतो " गजरा " आरत प्रीतीची हाक त्यात म्हणून कसा फुलतो " गजरा " प्रेमाखातर तुझीयासाठी म्हणून मी आणतो " गजरा " तू कळि मोहक जशी फुलाफुला त तसा तसा, तो खुलतो " गजरा " तुझाच सुगंध घेऊन सखे, आसंम ती दरवळतो " गजरा " पाहती तेव्हा सारेजन तुलाच माझ्या मनी तव मोहर तो " गजरा " माझी प्रीत घेऊन कुशीत केसात तुझ्या श
Taxonomy upgrade extras

गुलाबी चांदणे

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 09/01/2009 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात लागे चाहुल तयाची मन आतूर आतूर उरी गोड थरथर, लाज करी चूर चूर कुणी उकलले माझे आज गुपित गुपित फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर गाणे गाई वारा तुझे माझ्या कानात कानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

वन्स मोअर,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 01/01/2009 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
वन्स मोअर, का पलिकडुन खुणावते आहे, मला कुणी का आठवुन देते,जे विसरले, मला कुणी चुंबनाचि गोडी, टाकली पुसुन, ओठावरुन मी का करुन देते आठवण,अधर चाळवुन ,मला कुणी फाडल्या, केल्या नष्ट ज्या प्रेम कविता मी का ऎकवते आहे ,ते प्रेमगीत, मला कुणी कधिराग,कधि अनुराग,कधि प्रेम,कधि आग, कधि हो, कधि नाहि,का गोंधळुन टाकतय, मला कुणी मुश्किलिन बुजत आहेत घाव, धरल्या खपल्या का उकलत आहे त्या,दंतव्रण दाखवुन, मला कुणी चुकलो,गमावल सारे, हरलो, ह्या खेळात मी का करतय उद्युक्त पुन्हा, डाव खेळण्या, मला कुणी पडला पडदा, संपली ,तिन अंकि शोकांतिका का सारखा वन्स मोअर, देत आहे, मला कुणी अविनाश. बेभान स्वछ्छंदि मुक्त जिवन
Taxonomy upgrade extras

नि:शब्द विजय (उद्धव मात्रावृत्त)

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 01/01/2009 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
त्या गर्दीत हो समोरी उभी दिपस्तंभासम ती तिज पाहुनीच भुललो मी ती मृगनयने लखलखती ती भासे खट्याळ हरिणी चुकवीत नजरेचे बाण मग अखेर नयने भिडतां हरपले स्वतःचे भान मग नजरेतूनच पटली खुणगाठ अंतरी मजला अदृश्य जाहलीच गर्दी दे हाक मानसी तिजला बोलले न काहि कोणी तरी सर्वकाही समजले पुजारी जरी शब्दांचा शब्दांवाचून जिंकले टिपः गेल्यावेळी बर्‍याच चुका केल्या होत्या आता काहि सुधारणा आहे का अजूनहि घोळ आहे हे नक्की सांगा

स्वप्नं

लेखक स्मिता श्रीपाद यांनी सोमवार, 22/12/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यातली रात्र असावी,डोळ्यांमद्धे स्वप्नं असावे अशा क्षणाला ओठी माझ्या,तुझेच केवळ नाव असावे. दुरुन कुठुनसा ओळखीतला,निशिगंधाचा सुगंध यावा, वार्‍यावरती वाहत अलगद,माझ्या श्वासामधे भिनावा. अशा क्षणाला मनात माझ्या,तुझेच केवळ गीत घुमावे, तुझ्या स्मॄतीने डोळ्यांमद्धे,माझ्या नकळत अश्रु जमावे. पाण्याच्या पडद्यातुन जेव्हा,दूर कुठेतरी तुला पहावे, स्वप्न असे की सत्य असे हे,माझिया मना मीच पुसावे. तुझ्या रेशमी स्पर्शाने मग,स्वप्नातुन मी जागे व्हावे, वास्तव सुद्धा असते सुंदर,हे माझ्या प्रत्ययास यावे. मग वाटावे,आपण आता,काळावरही मात करावी, इथेच थांबू द्यावा हा क्षण,फक्त तुझीच साथ असावी... फक्त तुझीच स