मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

" गजरा "

sanjubaba · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्वप्नात येऊन माझ्या रंगतो आणि पापण्यावर भिरभिरतो " गजरा " माझे गीत घेऊनी ओठात तुझ्या केसात शिरतो " गजरा " तुझ्या भावना, तुझे दु:ख न विचारता मज सांगतो " गजरा " तुझेच स्वप्न या जीवनात मला सखे, देतो हा " गजरा " आकाशातल्या चांदण्यासम तुझ्या केसात वाटतो " गजरा " पूजा करावी जशी रतीची तसा तुज मी वाहतो " गजरा " आरत प्रीतीची हाक त्यात म्हणून कसा फुलतो " गजरा " प्रेमाखातर तुझीयासाठी म्हणून मी आणतो " गजरा " तू कळि मोहक जशी फुलाफुला त तसा तसा, तो खुलतो " गजरा " तुझाच सुगंध घेऊन सखे, आसंम ती दरवळतो " गजरा " पाहती तेव्हा सारेजन तुलाच माझ्या मनी तव मोहर तो " गजरा " माझी प्रीत घेऊन कुशीत केसात तुझ्या शोभतो " गजरा " जेव्हा पासून तू या मनात खरच, मज आवडतो "गजरा" मी दिलेल्या पाकळ्याचा सांग तुला का कळतो "गजरा" नजर लागता दुसरा-या कुणाची अ चानक को मजतो " गजरा " निखा-यासम या मनात सखे, माझ्या मग जळतो " गजरा "

वाचने 1764 वाचनखूण प्रतिक्रिया 0