मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुलाबी चांदणे

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात लागे चाहुल तयाची मन आतूर आतूर उरी गोड थरथर, लाज करी चूर चूर कुणी उकलले माझे आज गुपित गुपित फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर गाणे गाई वारा तुझे माझ्या कानात कानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात जयश्री अंबासकर

वाचने 4080 वाचनखूण प्रतिक्रिया 17

मदनबाण Fri, 01/09/2009 - 13:39
घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात व्वा.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मृगनयनी Fri, 01/09/2009 - 13:58
आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर अ प्र ति म ! अजुन येऊ द्यात.

प्राजु Fri, 01/09/2009 - 21:04
दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात सुरेख ओळी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी Fri, 01/09/2009 - 21:39
मदनबाणा, मृगनयनी, चंद्रशे़खर, लिखाळ, राजासाब, मीनल, प्राजु, चतुरंगा, तहे दिल से शुक्रिया :) तुमचे प्रतिसाद मनाला खूप सुखावून गेले.

श्रावण मोडक Fri, 01/09/2009 - 21:40
वाटले शब्दांची सुंदर उधळण आहे. दुसऱ्यांदा वाचली आणि पोचली आतमध्ये. म्हणजे दोन्ही परिणाम साध्य.

संदीप चित्रे Fri, 01/09/2009 - 22:43
जियो जयश्री... खूप दिवसांनी तुझी कविता वाचली. खूप आवडली हे सांगणे नलगे ! :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

विसोबा खेचर Fri, 01/09/2009 - 23:52
दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात हम्म! नादावण्याचंही एक वय असतं! :) असो, जयू, नेहमीप्रमाणेच सुंदर कविता..! पण जयू, आज चाळीशीतही मी नादावला जातो त्याचं काय कारण असावं बरं? :) तात्या.