लेखकजागुयांनी मंगळवार, 02/06/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजची पहाट उगवली
अन आठवणींची कळी उमलली
वांड्गनिश्चय आपुला रंगलेला आजदीनी
पहिली भेट ती तुझी न माझी
चोरून एकमेकां पाहण्याची
अनोळखी मने एकमेकां गुंतण्याची
भाटमुखी मंत्रोच्चार मंगलसमयी
तुझ्या माझ्या नात्याच्या स्विकाराची
शुभाशिर्वाद आहेत साखरभरल्या मुखांची
मित्रपरीवारा संधी चिडवण्याची
भरवण्याचा तो सोहळा गुलाबी
अजूनही आहे गोडी सहजीवनी
भरवलेल्या त्या पेढ्याची
लेखकजागुयांनी सोमवार, 01/06/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
पाहायचं आहे हळूच तुला
माझी वाट पाहताना
डोळ्यांची माझ्या वाटेवर
अधीर नजर रेंगाळताना
पहायचं आहे हळूच तुला
माझ्या आठवणीत रमताना
आठवण काढत काढत
तु गालात लाजताना
पहायचं आहे हळूच तुला
माझ्यासाठी अश्रू ढाळताना
काळजातले अश्रू ढाळत
वाहणारे प्रेम पाहताना
पहायचं आहे हळूच तुला
मी स्वप्नात येताना
स्वप्न पाहत पाहत
गोड भाव फुलताना.
लेखकजयवीयांनी शुक्रवार, 29/05/2009 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
उगाचंच बिचारी वाटते माझी मी मलाच...
तुझ्याशिवाय....
सगळंच तुझ्या अवगुंठनात बांधलेलं
सोडवू म्हटलं तर अजूनच आवळणारं
कसा घेणार रे मी मोकळा श्वास...
कसली होतेय तडफड...
लेखकक्रान्तियांनी गुरुवार, 21/05/2009 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
असा फिरे रानभर वारा हा पिसाटलेला
जसा माझ्या रोमरोमी तुझा छंद दाटलेला
मेघांच्या रुपेरी कडा एकाएकी काजळल्या
तुझ्या मीलनाच्या आशा मनामध्ये उजळल्या
खळाळून वाहे पुन्हा झरा जसा आटलेला
इंद्रधनू झूल्यावर मन उंच झोके घेई
कधी तुझ्या वाटेवर चातक होऊन जाई
(जसा पाऊस होऊन तूच त्याला भेटलेला!)
लखलखणारी वीज काळ्या अंगणात नाचे
तुझ्या स्मृतींनी तेवती लाख दिवे झुंबराचे
मल्हाराचे सूर छेडी जीव हा झपाटलेला
अशा सुखाच्या धारांनी चिंब चिंब भिजताना
ओल्या मातीच्या कुशीत नवा प्राण रुजताना
साद घालतो प्राजक्त फुलांनी लपेटलेला
लेखकऋषिकेशयांनी गुरुवार, 21/05/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांशिवाय भावना दिसतात नयनी तुझ्या
शब्द दडले डोकावून हसतात नयनी तुझ्या
गजरा माळून माझे भाव टिपशी आरशात
ताटवेच्या ताटवे फुलतात नयनी तुझ्या
वीज येवून मिळावी पावसात चिंब मिठी
थेंबहि मग पाण्याचे भिजतात नयनी तुझ्या
तु जवळ असताना चंद्रहि मग लाजतो
चांदण्याचे रंग कारण खुलतात नयनी तुझ्या
तु समोरी येताच माझे शब्द देतो फेकूनी
पाहूनच ऐकतो ते बोलतात नयनी तुझ्या
निरोप कशाला घ्यायचा मनास वाटे जरी
निरोपाचे हातहि मग झुरतात नयनी तुझ्या
ऋषिकेश
(१४-०५-२००९)
लेखकगोगट्यांचा समीरयांनी सोमवार, 04/05/2009 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
विचार करतो तुला सांगाव कसं?
माझं मन तुला कळावं कसं?
सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही,
Romantic मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही,
हा विचार तर चालुच राहिल ,
पण मला तु आवडतेस आणि हा विचार बदलत नाही!