Skip to main content

प्रेमकाव्य

उधळीत जा ग फुले मोग-याची

लेखक अनिल भारतियन यांनी गुरुवार, 21/08/2008 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत तीर गालात खळी जीव जातो इशा-यात बळी चालण्याचा डौल गजगामिनी फुले मन्मनी गुलाबीच धुंदी उधळीत जा ग फुले मोग-याची त्याचा गंध मना मधे दरवळू दे हवेमधे फेकता दुपट्टा रेशमी ढळे विश्वामित्री माझी समाधी वाटे जणू तू अप्सरा स्वर्गीची तपोभंग माझा सहजी करीशी नजरेतून देशी मदिरेचे प्याले नशा बघ कशी ध्यानात चढते
Taxonomy upgrade extras

आठवण........

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 20/08/2008 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
..आठवण माझी कधीतरी येईलच तुला तु कदाचीत रडशीलही हात तुझे जुळवुन ठेव तु सगळी आसवं तुझी त्यात सामावतील जो थांबला तुझ्या हातावर नीट बघ त्याच्याकडे एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल माझ्या आठवणी एखदयाला सांगताना तु कदाचीत हसशीलही जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता नीट वापर त्याला अडखळलेला तो शब्द मीच असेल कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला त्याच्या तेजाला तु निखरत राहशील मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल कधी जर सुटला बेधुंद गार वारा मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल........
Taxonomy upgrade extras

चमचम करती ऐने

लेखक स्वांतसुखाय यांनी सोमवार, 18/08/2008 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या साठी नटून बसले काळी चंद्रकळा नेसून रातराणीचे गंध उडवले चोळी ऐन्याची घालून
जरा टेकून घ्या, पान लावलेले खा घाई साजणा, का बरे झाली? हात हळूच लावा, जरा जपून राखा माझी आंब्याची रसाळ डाली
चमचम करती दंडावर किती ऐने नाजूक बिलोरी उरावर कशी खुलून दिसते छबी साजणाची प्यारी
नको नुसता मुका, स्वाद थोडा चाखा खुणावते गुलाबाची लाली हात हळूच लावा, जरा जपून राखा माझी आंब्याची रसाळ डाली
उगा झोंबाझोंबी नको हो राया जातील ऐने फुटून बगा थरथरे रेशमी काया अहो पाटील थोडे जपून
रात उरली बगा, जरा दमान वाग
Taxonomy upgrade extras

झुरणी - लेखणी

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 14/08/2008 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे....... कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडू तुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेस स्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहून तरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन माझं काय विचारतेस आता माझी कविताही थकली आहे फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......
Taxonomy upgrade extras

बंधने

लेखक स्नेहश्री यांनी रविवार, 03/08/2008 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
झुगारुन टाकावीशी वाटत आहेत ही बंधने काहीतरी शोधत आहेत माझ्या मनाची स्फंदने काहीतरी बोजड घेऊन चालते आहे उगीच कोणाच्यात तरी मन गुंतवत आहे तुझ ते scapbook मला अस्वस्थ करतय आणि एकीकडे मात्र माझ मन तुझ्यासाठी झुरतय गुंतत आहे फक्त तुझ्यासाठीच पण मनात येत आहे,काय करायच त्या "scap"च माझच मला कळत नाही की नक्की आता काय करायच तुझ्या बरोबर आयुष्य काढायच का तुला विसरुन जायचा...???

सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

लेखक फटू यांनी गुरुवार, 24/07/2008 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
जरी बसणार नाही या गोष्टीवर विश्वास माझा लाभणार नाही मला पुन्हा जरी सहवास तुझा मनाची मात्र तयारी अजून होत नाही माझ्या सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या जेव्हा कुणी समोरून क्षणी निघून जातं माझ्या जणू ती व्यक्ती तू असल्याचा भास होतो राजा तुझी मुर्ती वसली आहे दोन्ही पापण्यांत माझ्या सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या असलो जरी मी अफाट दुनियेमध्ये मिसळलेला आतून मात्र मी आहे पुर्ण हरवलेला अन एकला या एकाकी जगामध्ये मला सोडून गेली तू राजा सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या जरी आजही होते पापण्यांची उघडझाप माझ्या त्या पापण्यांवरची स्वप्नं तुझीच होती रे राजा ती सारी स्वप्नं राज्य करतात
Taxonomy upgrade extras

विठू सांगे...

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 18/07/2008 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढाचा मास । दर्शनाची आस । होती तुझे भास । पांडुरंगा । । साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री । दिवसा नि रात्री । रूप तुझे । । खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी । वसतो पंढरी । विठू राया । । भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी । कर कटेवरी । ठेवोनिया । । काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा । मनाचा निर्मळा । पांडुरंग । । नामयाचा घास । घेऊनिया खास । जागवली आस । भक्तीयोगे । । घेऊनी वळण । दळितो दळण । करितो राखण । जनाईचे । । तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ?

छचोर

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 12/07/2008 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस इतका छचोर आहे साला! ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की फरक फक्त इतकाच - तो कोसळतो,मी ढासळतो दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं की माझं पाणी पाणी होतं आणि लाजून लाजून तुझंही मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला! पाऊस इतका छचोर आहे साला!
Taxonomy upgrade extras

पहिली भेट

लेखक अनंतसागर यांनी शुक्रवार, 11/07/2008 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळी कातरवेळी प्रेमज्योत मनी पाझळली परतीच्या त्या रस्त्यावरती माझी सोबतीन मला भेटली. मी होतो उधान धुंदीत चर्या तिची गंभीर निवांत. प्रवासात त्या मला लाभली क्षणभर तिची अनमोल साथ. न राहून ती मज संगे बोलली प्रेमकळी मन्मनी खुलली. होतो कधी अनोळखी आम्ही दाट मैत्री आता जाहली. आता आमुच्या गप्पा रंगल्या खळ्या तिच्या गालावर खुलल्या. पाहताना तिचे गोड रुप ते प्रेम कविता मनी उमलल्या. निरोप देता झालो बैचेन विरहाने दुभंगले मन. आपण भेटू पुन्हा लवकर असे तिने मला दिले वचन.

कुणास ठाऊक..?

लेखक स्नेहश्री यांनी शुक्रवार, 04/07/2008 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या या धोरणानुसारयेथील साहित्य काढून टाकण्यात आलेले आहे. स्नेहश्री यांनी मिपाचे धोरण समजून घेऊन त्याचा आदर राखल्याबद्दल मिपा त्यांचे आभारी आहे! --जनरल डायर.