Skip to main content

प्रेमकाव्य

वाट पाहतोय

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 03/11/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
तु नाही म्हणालीस, ह्या वादळात आणि अश्रुंच्या पुरात, माझ्या मनाने बांधलेले तुझे-माझे आपलं इवलसं घर उध्वस्त झाले पण परसातली रातरानी तशीच आहे, ती वाट पाहतेय, कोणाची ते माहीत नाही अंगनातली बाग वाहुन गेली पण मोगरा तसाच आहे, त्याच्यातली कुठ्ली ही जिद्द माहीत नाही, त्याला कोणाच्या केसांत माळायचे आहे, माहीत नाही अंगणातली तुळस ती पण तग धरुन आहे , का कोणासाठी ते माहीत नाही आणि त्या माझ्या मनातल्या उध्वस्त घराजवळ, आभाळाएवढ माझं वेडं मन इवलसे होउन बसलय, घराकडे येणार्‍या हिरव्या पाऊलवाटेकडे डोळे लावुन, का कोणास ठाउक ...

'अग तारा गाव झोपलाय सारा'

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/10/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
'अग तारा गाव झोपलाय सारा' हे गीत श्री. प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात गायलेले आहे. गीतकार आपल्या ताराला 'आता रात्रीचे बारा वाजलेत व सारा गाव झोपलाय' असे सुचवतो. हे गाणे ऐकून काही मंडळी आपली नाके मुरडतील पण जनसामान्यांना असलीच गाणी आवडतात व जनसामान्यांचीच संख्या जास्त आहे. दुर्बोध, र ला र ट ला ट टाईप कवितांपेक्षा त्यांना असलीच डोक्याला ताप न देणारी गाणी आवडतात.

<काहीच्या काही ...> अर्थातच कैच्या कै

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 30/10/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आभास कविता कि पास कविता *त्यास कविता मिळालेली | हे शिडशीडीत ना फटफटीत ना धडधडीत साध्य कसे ? अर्थ गर्भ पोरी खिसा कशी जाळी गूढ कधी काळी घे जाणोनी | शब्दांचा कंटाळा अर्थांचा घोटाळा नि*धाचा पाचोळा फार झाला | तो श्वास, नि: श्वास लसणाचा वास सार बाजू त्यांस आज तूही | मागणी प्रमाणे प्रेम प्रसवावे मूढ प्रेमीस रे कोणी सांगा | चलनात नाणे मद्य आणि खाणे 'बार' ' बार' करणे एक सत्य | पाहिजे तनू जे पाहता स्तब्ध करी नाद लुब्ध समोरच्यास | आम्हा व्यथा फार नको पुन्हा भार जगू क्षण चार एकट्याने | जो घेई अर्जंटं होई डॉक्टरी पेशंट तो इंटेलिजंटं होई
काव्यरस

फक्त तुझ्यासाठी...(परत कविताच!)

लेखक प्रभो यांनी रविवार, 11/10/2009 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल तीला भेटणार होतो...पण ऑफिसमधे काम आल्याने बाईसाहेब काही भेटायला येउ शकल्या नाहीत...बसल्या बसल्या खालील कविता सुचली.. त्या दिवशी होती सकाळ कुंद ढगांनी भरलेली | ओले केस घेऊन न्हालेली तू बस साठी थांबलेली || वाटलं तुझ्या ओल्या केसातून फिरावं वारा बनून | काळजाची धकधक वाढली तुझ्या गालावरची खळी पाहून || तुझ्या त्या डोळ्यांच्या समुद्रात मारावी वाटतेय डुबकी | काढलेल्या तुझ्या आठवणींनी लागते का गं रोज उचकी || आजकाल तुझं दिसणं झालय आमवस्या पौर्णिमा | वेडा करतो गं तुझ्या गालावरचा तो कातील रक्तीमा || तू नसलीस जवळ की मन भटकतं माझं रानी-वनी | विश्वास ठेव माझ्यावर तूच बसलीय गं माझ्या मनी ||
काव्यरस

फक्त तुझ्यासाठी ...(यावेळी कविता)

लेखक प्रभो यांनी बुधवार, 30/09/2009 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : काल तीला भेटलो...ती धड हो म्हणत नाही....तिच्यासाठी ही कविता.... तू कुठे गेलीस सखे, मला सोडून या एकांतात | तुजवाचून सर्व रूक्ष आहे, माझ्या जिवनाच्या वाळवंटात || ऐक माझ्या मनातून, तुझचं नाव येतंय | तू नसताना माझ्या प्रेमाचं शीड, उगाच हेलकावे खातंय || प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा | जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा || नयन तुझे गहिरे, जणू मदनाचे बाण | तुझ्या एका कटाक्षापायी, येतो कंठाशी प्राण || तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर | तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर || आसुसलेल्या धरतीची, धग शमवतो वरूणराजा | तुला जिवनसाथी बनवून, वाजवायचाय मल
काव्यरस

फक्त तूझ्यासाठी

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 24/09/2009 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या काही चारोळ्या मी तिच्यासाठी लिहिल्या होत्या...पण तिला सांगण्याची वेळच आली नाही ..... जाउद्या मंडळी..ते पुन्हा कधीतरी... १. पारिजातक सकाळ सकाळ अंगणात पडतो पारिजातकाचा सडा जसा| रांगोळी काढताना तुला पाहिलं जीव झाला माझा वेडा तसा || २. तिळ तू जवळ असलीस की पडतं चंद्राचं चांदणं | चंद्राचा डागच मला जास्त आवडतो म्हणून तर तुझ्या गालावरच्या तिळाला न्याहाळणं || ३. असणे-नसणे तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस | तू समोर नसतेस तेंव्हा झोपू देत नाहीस || ४.वाट वाट बघत माझी होतीस उभी तू स्टॉपवर | मुद्दामच उशीर केला जीव जडलाय तुझ्या लटक्या रागावर || ५.
काव्यरस

पूर्वाध - ऊत्तरार्ध

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 17/09/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : मला कविता, मुक्तक , विडंबन ही फक्त नावे माहीत आहेत. त्या कशाशी खातात मला माहीत नाही. तर त्यामुळे खालील लेख (????) सॉरी...कविता स्वतःच्या जबाबदारीवर वाचावी.
काव्यरस

सारे कसे नवे नवे वाटते

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/08/2009 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
सारे कसे नवे नवे वाटते सारे कसे नवे नवे वाटते तुझ्या प्रितीने काहूर मनी दाटते || ध्रु || फुलतात फुले, सुगंधतात मने हरघडी वसंत बहरतसे || १ || राग नवा आळवू चल गोड नवी गाणी बोल बोल कानात माझ्या गूंजते || २ || साथ माझी घे हात हाती दे चालत जावू दोघे लांब रस्ते || ३ || -पाषाणभेद

प्रपोजल्

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 16/07/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी, पण टपोर्‍या आषाढी थेंबांचा सर घातलाय पावसाने आधीच तुझ्या गळ्यात ओल्या मातीच्या ठिपक्यांचे घातलेस मेंदीसारखे पैंजण तुझे तूच पायात डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं, ढग वाजवून सांगेन म्हटलं, वार्‍याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं, तर स्वत:भवतीच गिरक्या घेत डोळे चिंब मिटून तू पावसाच्या मिठीत आणि माझे शब्द, सूर सगळे चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत या भिजल्या-थिजल्या कवितेचं प्रपोजल् व्हायची वाट बघत
काव्यरस

तुझा हळवा पाऊस

लेखक जयवी यांनी सोमवार, 08/06/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ह्या कवितेला देवकी पंडितांचा स्वरसाज लाभलाय "सारे तुझ्यात आहे" ह्या अल्बम मधलं हे गाणं !
Taxonomy upgrade extras