Skip to main content

प्रेमकाव्य

पुन्हा पहिल्या सारखं

लेखक rahulkransubhe यांनी सोमवार, 08/12/2008 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
आता तू पहिले सारखं माझ्याशी बोलत नाहीस तुझा थोडा वेळ सुध्दा माझ्या समवेत घालत नाहीस माझ्यावर तुझा राग आहे मी मान्य करतो त्यसाठी मी तुला पुन्हा एकदा सॉरी म्हणतो मला माफ करुन तू पुन्हा माझ्याशी बोलत रहा पुन्हा एकदा नव्याने माझ्याशी मैत्री करुन पहा तू बोलली नाहीस की, दिवस माझा कटतं नाही मित्रांसोबत, घरच्यांसोबत कोणाशीही माझं पटत नाही तुझी मात्रीच फक्त आता या जीवाला हवी आहे छोट्या चुकीची फार मोठी सजा तू मला देत आहे सजा तुझी मागे घे अशी फर्याद मी करतो वाचलस तर या चुकीचा जुर्माना सुध्दा मी भरतो जुर्माना काय आहे हे तू मला सांगुन पहा पण माझ्याशी तू पहिले सारखं बोलत रहा तुझ ते दोन वाजे पर्यंत थ
Taxonomy upgrade extras

लव लेटर

लेखक कशिद यांनी रविवार, 07/12/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
टिप -मला ऑरकुट ही कविता सापडली मी लिहिली नाही आहे पण मिपा करानासठी खास आणली आहे [:0] सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचा आणि सहकार्य करा.. प्रशासकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.
Taxonomy upgrade extras

कष्ट करणार्या " तिला "

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 25/11/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
दाटले डोळ्यांत अश्रू, ते ही कां विकणार तू ? कष्टाची ना इथे ग किंमत, कां मरेमरेतो जगणार तू ? कर्तव्याची देऊन दाने, अशी किती उरणार तू ? पुण्यासाठी करुनी पुण्ये, उरता उरता विरणार तू. जागजागुनी असंख्य रात्री, वाढविले जरी तू त्यांना जाण येऊनी उडुनी गेले, सांग किती धरणार तू ? कठोर कर्तव्याची केवळ कांस कां धरणार तू ? ध्यास घेऊनी वसंतऋतूचा सांग कधी झुरणार तू ? मागणारे मागतच असतात, सांग किती पुरणार तू ? याचकांचे विश्व सारे, हात किती देणार तू ?

एक कविता

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 22/11/2008 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मी कॉलेजमध्ये असताना केलेली होती. थांबू नकोस तू, ओळख देण्यासाठी नादात हरवल्या एका वेड्यासाठी तो म्हणतो "गाणे रुसले गाता, गाता, शब्दांस टाळुनी गेली एक कविता" हे गाणे नाही, हे तर त्याचे जळणे कवळून आठवणी, झाडामागे हसणे ती सुरेल गाथा, झुरण्यासाठी आता शब्दांस टाळुनी गेली एक कविता आठवतो चांदण्या रात्रीमधले श्वास 'याचना फुलांची', होता केवळ भास त्या याचकास ना उरला कोणी दाता शब्दांस टाळुनी गेली एक कविता

रितेपण

लेखक जयवी यांनी मंगळवार, 18/11/2008 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
श्वासांचं गुदमरणं काही नवीन नाही आताशा तू मनात नुसता डोकावलास जरी..
Taxonomy upgrade extras

येऊ तशी कशी मी फारीनला?

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 16/11/2008 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
कशापायी रामराव करता घाई? नका लावू पासपोर्ट काढायला.... येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला? येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला? सण वर्साचा झाला दिवाळी भरगच्च फराळ अन् जेवनबी भारी एकसो-बीसची खुमारीच न्यारी एकसो-बीसची खुमारीच न्यारी... तात्या बघे पिचकारी मारायला हो.... येऊ तशी कशी मी फारिनला? येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला? गाव हाय तुमचा बत्तीस कोसं गाडीविना बाजारात जायाचं कसं हायवेवरनं चालन्याचा त्रास... हायवेवरनं चालन्याचा त्रास... होंडा गेली टायर सांधायला हो... येऊ तशी कशी मी फारीनला? येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?

हा स्पंद फुलण्याचा

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 06/11/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उन्मादूनी उसळतो आनंद अंतरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा हातात पावसाची ओली फुले उमलती पाण्यात नाचताना जणू थेंब ताल होती झाडांतूनी पसरतो नवश्वास पालवीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा आरश्यात पाहताना प्रतिबिंब रोज हासे माझे मलास सांगे, हे दिवस श्रावणाचे अंगातूनी फिरे मग, स्वरनाद बासरीचा सारी नवी उ भारी, हा स्पंद फुलण्याचा लपुनी पुन्हा पुन्हा मी, मलाच साद देई थरकून पैंजणांना, हलकेच नाद देई लडीवाळ स्पर्श होतो, गालांवरी फुलांचा सारी नवी उ भारी हा स्पंद फुलण्याचा

पहाट

लेखक दत्ता काळे यांनी सोमवार, 27/10/2008 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
दीप निवले रात्रीचे पहाटही अशी फुले केसातील मोगरयाचा गंध अजून, अजून खुले शब्द नव्हे ओठांवर नाजुकसे चांदणे टिपले जरी, परी ऊमले ओठांच्या स्पर्शाने लाजलीस जेव्हा तू वेड मला लागले श्वासातील गंधभान स्पर्शातच जागले पहाटेला भेटण्यास रात्र परत आली उगवली पुन्हा फिरूनी क्षितीजावर चांदणी
Taxonomy upgrade extras

सावली

लेखक राघव यांनी बुधवार, 22/10/2008 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा श्रीवर्धनला गेलो असतांना किनार्‍यावर मस्त वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर सावलीच्या माध्यमातून विरह मांडण्याची कल्पना सुचली. ती हुरहुर शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न!!
Taxonomy upgrade extras