माझ्या ह्या कवितेला देवकी पंडितांचा स्वरसाज लाभलाय "सारे तुझ्यात आहे" ह्या अल्बम मधलं हे गाणं ! हे गाणं ह्या लिंक वर ऐकता येईल.
http://maanbindu.com/showMusic.do?field=sangeet&name=Sare-Tuzyat-Aahe
तुझा हळवा पाऊस
आज आठवतो मला
चिंब सरीनं तयाच्या आज
भिजवतो मला
कधी बरसणं तुझं
रिमझिम अलवार
नखशिखान्त भिजते
त्यात मी रे हळुवार
कधी तुफानी कोसळ
गरजत बरसत
कधी झिम्माड झिम्माड
द्वाड प्रीत फुलवत
आता कधी रे येशील
मनी सारखा सवाल
घन दाटता नभात
पुकारते वेडी प्रीत
तुझ्याविना हा पाऊस
आसू आणतो डोळ्यात
धरा कोरडी कोरडी
परी डोळे वाहतात
जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2828
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
धरा कोरडी
अभिजित राणे
In reply to धरा कोरडी by सुबक ठेंगणी
सारे तुझ्यात
हेच म्हणते..
एकतच रहावा
कविता फारच
सुंदर शब्द...
सुंदर !
छान
जयूची
खुपच छान
खुपच छान
तहे दिल से