Skip to main content

प्रेमकाव्य

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 20/03/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.

https://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/

प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे ....
तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे .......
धन्यवाद!!

काठावरती तुम्ही उभे (बैठकीची लावणी)

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 16/03/2010 18:21 या दिवशी प्रकाशित केले.


काठावरती तुम्ही उभे (बैठकीची लावणी)

फुलपाकळ्या कुस्कूरूनी टाकल्या तलावी या पसरूनी
काठावरती तुम्ही उभे! पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा

दिवस नाही अन रातही नाही सुर्यफुल हे उमलू पाही
सुगंधीत या पाण्यामध्ये वत्रांकित पहूडले मी एकटी
धुकाळ या अशा पहाटे मोहरली मज काया ||१||

तरी तुम्ही काठावरती उभे? पाण्यात उडी घ्याना ||धृ||
अहो सजणा, मनरमणा

काव्यरस

)तुझ्या रेशमी केसांनी(

लेखक sur_nair यांनी रविवार, 14/03/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.

विजुभाउंची कल्पना आवडली https://www.misalpav.com/node/11426. जरा वेगळा मार्ग निवडलाय पण प्रेरणा तुमचीच

तुझ्या रेशमी केसांनी, केलीस काय किमया
कित्येक गळे कापले, केलेस जीव वाया

तुझ्या रेशमी केसांनी, आषाढमेघ लाजले
श्वासात गंध भरुनी, उरात पूर वाहिले

तुझ्या रेशमी केसांनी, उधाण येई अंधारा
अवसेची रात्र काळी, कि देवळातील गाभारा?

तुझ्या रेशमी केसांनी, भलतीच होय जादू
वेणीत बांध यांना, नको मोकळे सोडू

- आत्तापुरता एवढंच सुचतंय

काव्यरस

आठव

लेखक आमोद यांनी मंगळवार, 09/03/2010 21:44 या दिवशी प्रकाशित केले.

वारा भन्नाट भन्नाट,
फांदी फांदी धुमशान्,
सखी तुझीया केशांचा,
येई आठव बेभान .

थेंब थेंब सुईगत,
अंग अंग शहारत,
सय तुझिया स्प्रशाची,
माझ्या मनी उफाळत.

गती वाढत वाढत
तना मनात भीनते,
तुझ्या सवेच्या दीसांतच,
मन का हे डोकावते?

चिंब ओलेत्या ढगांची,
इथं गळाभेट होते,
तुझिया मिठीची ओढ,
मात्र फोफावत जाते.

ह्या अचाट पाण्यात,
दंगा माझिया मनात,
फुफाटत वेडा खुळा,
अग्निलोळाचा प्रपात.

काव्यरस

जाणीव

लेखक तुका म्हणे यांनी मंगळवार, 09/03/2010 17:08 या दिवशी प्रकाशित केले.

तू गेल्यावर शरद चांदणे, कधीच पडले नाही,
पुन्हा पहाटे निशिगंधाचे फूल उमलले नाही.

तू गेल्यावर पुन्हा मोगरा, तसाच सजला नाही,
खिडकी मधुनी चंद्र चोरटा, कधीच दिसला नाही.

तू गेल्यावर हरवून गेली, अंधारातील वाट,
आकाशातील ताऱ्यानशी मग, पुन्हा न घडली गाठ.

तू गेल्यावर पाउस पहिला, कधीच पडला नाही,
अन भिजलेला सूर गळ्यातून कधी उमटला नाही.

तू गेल्यावर कधी न घेतल्या, अंगावरती लाटा,
वाळू मध्ये तुला शोधतो दूर किनारी आता.

तू गेल्यावर वाटे मजला, असे हरवले काही,
शोधीत फिरतो इथे तिथे, पण तरी गवसले नाही.

- तुका म्हणे

काव्यरस

अंतर

लेखक sur_nair यांनी शुक्रवार, 05/03/2010 19:38 या दिवशी प्रकाशित केले.

अंतर

शब्दांच्या सुंदर जाळ्यात मला अडकवू नकोस
वचनांच्या खोल बंधनात उगा बांधू नकोस

बोटात बोटे गुंफून दोघे हवे तेवढे फिरू
मनगटाभोवती मात्र कधी नकोस हात धरू

सहज सुटण्याइतकी दोघांतली सैल गाठ नको
पण श्वास कोंडेल असा घट्ट गळफासही नको

रागावू नको, माझी प्रेमाची कल्पना जरा निराळी आहे
फक्त भावनांचा रस नाही अनुभवाचं सारही आहे

शेवटी काही असले तरी तू 'तू' आहेस, मी 'मी' आहे
दोघेमिळून 'आपण' असलो तरी…. त्यात 'पण' आहे

लावणी - खास होळी निमित्त

लेखक sur_nair यांनी रविवार, 28/02/2010 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
गेली संक्रांत आली बाई होळी हो
नाही काही तुमचा पता
कुणासंग पंचीम रंगाची मी खेळू हो

सन भाग्याचा, आहे फार मोठा
घरला या धनी, राग आता सोडा
तुम्हांसाठी केली, पुरणाची पोळी हो

दिस उन्हाळी, सोसवेना उन
किती पुसावं, घामाघूम अंग
आग लावी राती, चंदनाची चोळी हो

तुमच्याविना शेज, सुनी सुनी लागे
विझली होळी अन, राख उरं मागे,
रोज खुणविते, चंद्रकोर भाळी हो

काव्यरस

जाते म्हणतेस...................

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 27/02/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.

जाते म्हणतेस...................

जाते म्हणतेस हरकत नाही
ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा

नाते तोडतेस हरकत नाही
मनी आज फक्त एकदा तरी राहून जा

भातुकली मोडतेस हरकत नाही
पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा

हसते आहेस हरकत नाही
माझी बुडती नाव पाहून जा

जाळत आहेस हरकत नाही
जळणारे माझे गाव पाहून जा

छळत आहेस हरकत नाही
माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................

मंगेश पावसकर

काव्यरस

चल उसात दंगा करू

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 25/02/2010 11:48 या दिवशी प्रकाशित केले.

चल उसात दंगा करू

मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला:
(पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.)

हिरो:

पिक आलं वयात आता
नको उशीर तू ग करू
अग पारू...
चल उसात दंगा करू

हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने
सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?

काव्यरस

काय करावे कळेना

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 17/02/2010 05:19 या दिवशी प्रकाशित केले.


काय करावे कळेना

काय करावे कळेना मजला
आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु ||

साडीवरती फुलली फुले, रंग तयांचा नारंगी
तसलीच कुंचूकी लांब हाती, शोभतोय अंगी
निर्‍या पायघोळ एकसरी, नेसण्याची रीत न्यारी
पाहूण जणू वाटते तु सुरी की ग दुधारी

ह्रूदय माझे तुझ्याकडे तरी
जिवंत मी कसा प्रश्न मजला || १ ||
आज पाहीले मी प्रियतमेला || ध्रु ||

चाफेकळी नाक तुझे भुवयांना वक्र बाक
काळे नयन पाणीदार पापण्यांची उघडझाप
मादक ओठ गुलाबी शब्दांचेच मदनबाण
चोरटी तू पाहू नको, मनातले सांगून टाक

काव्यरस