कुठवर पाहू तुझी मी वाट

पाषाणभेद जे न देखे रवी...
कुठवर पाहू तुझी मी वाट

कुठवर पाहू तुझी मी वाट
सा़जणा, आठवण तुझी येते ||

एकटी मी मनामध्ये कुढते
वेड्या शंकेने उर धडधडते ||

भेट तुझी आहे जवळी
तिच्यामध्येच तुला बघते ||

असेल कारे स्थिती तुझीही
माझ्यासारखी आठवण येते ? ||

कुठवर राहू एकटी मी
मिलनासाठी तडफडते ||

- पाषाणभेद
वर्गीकरण
Taxonomy upgrade extras

5 टिप्पण्या 2,244 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

चिरोटा नवीन

आहे. "मिलनासाठी तडफडते" तडफडते शब्दाऐवजी दुसरा कुठला शब्द जास्त ठीक बसेल काय? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

पाषाणभेद नवीन

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. ( हि पंच लाईन कशी वाटते ? टाकतोच.) त्याचप्रमाणे ही कविताही सार्वजनीक - तुमचीच आहे. तिचा आपण हवा तसा वापर करावा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

सागर नवीन

पाषाणभेद, छोटीशी पण सुंदर कविता मनास भावली व्यक्तीशः मला "मिलनासाठी तडफडते" हे आवडले व पटले पण. बदलायची गरज मला तरी वाटत नाही... तडफडण्यात जेवढी व्याकुळता आहे , ती फक्त त्या शब्दानेच चांगली व्यक्त होते असे मला वाटते... :) अजून येऊ द्यात (कविताप्रेमी) सागर अवांतर : एवढी लहान कविता मी कधी लिहायला शिकणार :( शॉर्ट ऍन्ड स्वीट :)

क्रान्ति नवीन

आज मिपावर वाट पहायचा दिवस आहे का? @) कविता मस्त आहे. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com