Skip to main content

असा फिरे

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 21/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
असा फिरे रानभर वारा हा पिसाटलेला जसा माझ्या रोमरोमी तुझा छंद दाटलेला मेघांच्या रुपेरी कडा एकाएकी काजळल्या तुझ्या मीलनाच्या आशा मनामध्ये उजळल्या खळाळून वाहे पुन्हा झरा जसा आटलेला इंद्रधनू झूल्यावर मन उंच झोके घेई कधी तुझ्या वाटेवर चातक होऊन जाई (जसा पाऊस होऊन तूच त्याला भेटलेला!) लखलखणारी वीज काळ्या अंगणात नाचे तुझ्या स्मृतींनी तेवती लाख दिवे झुंबराचे मल्हाराचे सूर छेडी जीव हा झपाटलेला अशा सुखाच्या धारांनी चिंब चिंब भिजताना ओल्या मातीच्या कुशीत नवा प्राण रुजताना साद घालतो प्राजक्त फुलांनी लपेटलेला
Taxonomy upgrade extras

वाचने 2242
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

"असा फिरे रानभर वारा हा पिसाटलेला...." डोळ्यासमोर सारे द्रुष्य उभे राहते. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

आवडली. अजून येऊ दे --अवलिया

अशा सुखाच्या धारांनी चिंब चिंब भिजताना ओल्या मातीच्या कुशीत नवा प्राण रुजताना साद घालतो प्राजक्त फुलांनी लपेटलेला सुंदरच... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

लखलखणारी वीज काळ्या अंगणात नाचे तुझ्या स्मृतींनी तेवती लाख दिवे झुंबराचे मल्हाराचे सूर छेडी जीव हा झपाटलेला या ओळी जबरदस्त! जियो....! आपला, (फ्यॅन) तात्या.

शब्दांची रंगीबेरंगी चित्तवेधक रांगोळी आवडली !!

जीवाची तगमग सांगणारे प्रेमकाव्य आवडले :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अहा..... मस्त गं !! लखलखणारी वीज काळ्या अंगणात नाचे तुझ्या स्मृतींनी तेवती लाख दिवे झुंबराचे मल्हाराचे सूर छेडी जीव हा झपाटलेला........ हे तर खासच :)