नाच नाचूनी नाचू मी किती
नाच नाचूनी नाचू मी किती
पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून ||
थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||
सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा ||
नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१||
काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम ||
मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२||
थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती ||
मिसळपाव
नूतनचे सर्वच चित्रपट एक से एक होते. पण तिचा ''सुजाता'' फार गाजला. मला विशेष लक्षात राहिला कारण एरवी कडक धोरणे असणार्या आमच्या शाळेत तो आम्हाला चक्क चित्रपटाची रीळे आणून सभागृहातील पडद्यावर दाखवला गेला.