उल्का
उल्का
उन्हाळ्याच्या रात्रीत मी बाहेर झोपतो,
झोपतांना काळेशार आभाळ पहातो.
काळ्याशार अंगणात शुभ्र चांदण्याचा सडा पडतो,
दर वेळी ठरावीक ठिकाणी प्रत्येक चांदणीचा थेंब दिसतो.
गेल्या पंधरवड्यापासून एक चांदणी वेगळी दिसते,
प्रत्येक थेंब शांत असतो, ही मात्र सतत हसते.
अचानक काल रात्री ती चांदणी खाली आली,
लोक म्हणाले, "ती चांदणी नव्हे, उल्का झाली."
मला तर असे वाटते, ती चांदणी कुणा ग्रहाच्या प्रेमात पडली,
आणि त्या ग्रहाच्या ओढीने स्वता:बिचारी भस्मसात झाली.
वर्गीकरण
मस्त!
छान
In reply to छान by दिपक
नाही हो दिपकजी
वावा!
In reply to वावा! by सहज
+१
In reply to वावा! by सहज
आता
आवडली कविता
In reply to आवडली कविता by बेसनलाडू
फक्त
In reply to फक्त by मराठमोळा
काळेशार
खूप आवडली.
खुप सुन्दर कविता
खरच छान आहे रचना