पूर्वाध - ऊत्तरार्ध
डिसक्लेमर : मला कविता, मुक्तक , विडंबन ही फक्त नावे माहीत आहेत. त्या कशाशी खातात मला माहीत नाही. तर त्यामुळे खालील लेख (????) सॉरी...कविता स्वतःच्या जबाबदारीवर वाचावी. ह्यातील एक ओळ तात्यांच्या गुरूजींची आहे ती साभार ऊचललीय.
लेखन मिपाच्या धोरणात बसत नसेल तर संपादकांनी काढून टाकायला हरकत नाही
पूर्वाध
जिवनाच्या ह्या वाटेवर, साथ हवीय कुणाची तरी |
दिसते रोज पण का मिळत नाही, ती स्वप्नातली परी ||
रोज रात्री डोळा लागतो, तिचीच स्वप्ने बघण्यासाठी |
मिळाली नाही तर तयार आहे, मरण्या मारण्यासाठी ||
तू तिथे मी ईथे, असा कसा हा न्याय |
तुझ्यापासून मला तोडणारा, आजून जन्मलाच नाय ||
राणी जगू कसं मी तुझ्याशिवाय, हे जरा सांग |
झुलवत ठेवून तू मला, नको हं देऊस टांग ||
आठवतात का गं तुला, ते दिवस समुद्रकिनारीचे |
जिवनात आलेल्या लाटेचे, ओथंबलेल्या श्वासांचे ||
पुढे काय झालं, ते कुणालाच कळालं नाही |
पाहिलेल्या चंद्रावर, आमचं यान कधी ऊतरलचं नाही ||
राणी म्हणाली, तुला सांगितलचं नाही का कोणी |
अरे वेड्या ..बोळा निघाला, आणी केंव्हाच वाहतं झालं पाणी || (ओळ तात्यांच्या गुरूजींकडून साभार)
ऊत्तरार्ध
गेलो होतो फिरत, असचं जूहूच्या किनार्याला |
लायनी मारलेल्या ज्यांच्यावर, त्या आलेल्या पोरं बाळं फिरवायला ||
म्हणालो स्वत:शीच, प्रेमात रहिला नाही काही राम |
आता बनुया किशन कन्हैया, दुसरे नाही काम ||
अशीच एके दिवशी, भरली "ती" मनात |
डोळे फिरले श्वास अडकला, धडकी भरली ऊरात ||
टाकला खोडा एक दिवस, करून थोडी हिंम्मत |
ती आणी तिचा बाप आले वसकन, काय रे तुझी किंमत ||
त्या दिवशी परत चालू झाले, पहिले पाढे पंचावन्न |
अश्वथाम्या सारखा भटकतोय इकडे तिकडे, वणवण वणवण वणवण ||
वर्गीकरण
छान
In reply to छान by दशानन
तुझ्याकडे नाय का??
In reply to तुझ्याकडे नाय का?? by प्रभो
राजेसायेब
छान
In reply to छान by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
लै वेळा
In reply to लै वेळा by प्रभो
छान कविता
चांगला
आणी
In reply to आणी by विसोबा खेचर
संपादन
चांगलं लिहिलं आहेस रे...