चांदणरात
लेखनविषय:
काव्यरस
पैजणी चांदणरात
तुझ्या स्पर्शात
हे प्राण घेऊनी आली...
स्पर्श संदिग्ध
जरासे मंद
गुलाब फिरले गाली...
ढवळते वारा
छेडील्या तारा
आकाश असे सचित्र...
उधळती रंग
पसरले गंध
हे भास मला विचित्र...
उरी मोगरा
प्रसविते झरा
तुझी मधुर काया...
क्षणाची भूल
उठविते झूल
निळी सावळी माया...
- कौस्तुभ
वाचने
2971
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
भारी लिहिले आहे
In reply to भारी लिहिले आहे by गणेशा
धन्यवाद
मस्त
In reply to मस्त by मन्या ऽ
धन्यवाद