Skip to main content

कस सांगू तुला

लेखक Pritam salunkhe यांनी गुरुवार, 02/04/2020 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस माझं हसणं तू माझं जगणं तू माझा ध्यास तू माझा श्वास तू कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस मला साखर झोपेत पडलेले एक गोड स्वप्न तू पहाटेची अल्लड झुळूक तू माझ्या पौर्णिमेचा चंद्र तू माझ्या सफेद आयुष्यात रंग भरणार तू  इंद्रधनुष्य आहेस.... कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस.. कोणाची तरी काळजी करायला शिकवणाऱ्या काळजीच  कारण  तू माझ्या जगण्याचा श्वास... आणि जगताना लागलेला ध्यास आहेस... कसं सांगू मी तुला तू माझ्या साठी कोण आहेस... कधी न पूर्ण होणार स्वप्न आहेस की कोणत्या नावाची गरज नसलेलं नात आहेस.
लेखनविषय:

वाचने 1567
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

लिहिते राहा. -दिलीप बिरुटे