Skip to main content

उसणं अवसान

लेखक कौस्तुभ भोसले यांनी मंगळवार, 12/05/2020 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी उसणं अवसान आणून म्हंटल होत. तुझ्यासाठी मी चंद्र तोडून आणीन... चांदण्यांचा गजरा करून तुझ्या केसांत माळीन... पण ते सार अशक्य होत..! अन् तरीही तू, माझ्या सोबत सुखाने संसार केलास... माझ्या प्रत्येक स्वप्नांना तू आकार दिलास... माझ्या सारख्या आणाभाका तू घेतल्या नव्हत्यास. तू फक्त एवढंच म्हंटली होतीस, तुझा हात धरुन मी नेहमीच उभी राहिन... -कौस्तुभ
काव्यरस

वाचने 3913
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आणि आवडलं तिचं नेहमीच हात धरुन उभं राहणं. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे