मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नृत्य

(कळले ते फंडे)

नाना चेंगट ·
प्रेरणा - ऋषीकेषाला कळलेले अंडे लिहिल्या लेखना पटकन केवळ कळले ते फंडे नेमक्यावेळी डिलिट करुनी मारले ते दंडे अनिवासी वाद, तोडी पाणी, भट्टी जमली वाट्टं परंतु मागच्या चावडीमागे शिजले ते फंडे धोरणाच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी तरी पेपरावरती शेवटी उरले ते फंडे झकास ठुमक्या नंतर देवा मनभावे स्मरले. दुखतील भावना म्हणूनी ढोसले ते फंडे रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान पण पीसीवर बसल्याबसल्या बोलले ते फंडे **नेहमीच्या फंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही सदर काव्य आमचे परममित्र परा यांना समर्पित.

शाळेतील संम्मेलन..

मुक्त विहारि ·
मूळ स्त्रोत (http://www.misalpav.com/node/22060) वरील लेख वांचत असतांना, युट्युब मध्ये गाणी बाल-गीते शोधायला लागलो.त्यात काही गाणी लहान मूलांच्या स्नेह-संम्मेलनात वापरलेली पाहिली.त्या गाण्यांच्या तालावर नाचत असतांना, मुले बर्‍याच चूका करत होती आणि आपण चूका करत आहोत किंवा आपला जोडीदार चूक करत आहे, हे काही त्यांच्या लक्षात येत न्हवते. मला पण माझा शाळेतील स्नेह-संम्मेलनातील , मी नाटकात भाग घेतला होता तेंव्हाचा किस्सा आठवला.तसा मी माझ्या शाळेत पहिल्या १० क्र.त येत असल्याने (७०-८०. मुलांत. म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी. अगदी ह्या म्हणी प्रमाणेच.

(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)

मोदक ·
(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी) सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे. बरेच चित्रपट येतात जातात, बर्‍याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते.. मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी. मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे माझ्याकडून कांही गाणी, १) मै तो रस्ते से जा रहा था.. २) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता..

मृत्युघंटा

नाना चेंगट ·
शह देण्यासाठी लांडग्याला झालेली कोल्हयांची युती शेपटाच्या लांब्या कमी पडल्या म्हणुन कापसाचे पुंजके टिंबाला जोडुन दाखवले तरसाने केलेली लांडग्याशी युती आणि हत्तीने घेतलेला लांडग्याचा चावा सहनही होत नाही सांगता येत नाही हत्ती डुलतोय मांस खावुन लांडगा मेला तर हत्तीचा घोडा लांब जायचे तर घोडाच बरा पण हत्ती असणं म्हणे भाग्याचे लक्षण छापकाटा करुन कुत्रे ठरवतील तरसाला मारायचे की स्वतः मरायचे काहीही असो जंगलाची मृत्युघंटा वाजत आहे होवुन जावु द्या खांडववना प्रमाणे अग्नीतांडव कदाचित इंद्रप्रस्थ उभे राहिल दग्धभुमीवर

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

मृत्युन्जय ·
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

तुम इक गोरख धंदा हो

यकु ·
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.

'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.

चित्रगुप्त ·
थोडीशी पार्श्वभूमी: सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा सहज टीव्ही वाहिन्यांची चाळवाचाळव करत असता एका 'मद्रासी' सिनेमातील नृत्य चाललेले दिसले. नर्तिका आकर्षक होती, तिचे काहीसे शृंगारिक हावभाव, पार्श्वभूमीला मंदिराच्या प्रांगणात चाललेले विविध गतिमान कलाविष्कार, संगीतातील आणि एकूण चित्रीकरणातील नाट्यमय गतिमानता इतकी भावली, की ते गाणे पुन्हा पुन्हा बघावे, ऐकावे, असे वाटू लागले.

हे धंदड तत्तड...पगार अजूनच वाढणार

राजेश घासकडवी ·
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! २०१२ मध्ये भारतातल्या नोकरदारांचे पगार ११.९ टक्क्यांनी वाढणार!! http://www.dayandnightnews.com/2012/02/indian-employees-to-get-11-9-salary-hike-in-2012-survey/ धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! तेही २०१० मध्ये १०.६ आणि २०११ मध्ये १२.६ टक्के वाढल्यानंतर!! http://www.deccanherald.com/content/56166/india-inc-may-give-106.html सरकारचं कौतुक करून, दुवा देऊन काही उपयोग नाही :) त्यापेक्षा नाचलेले काय वाईट ! :) धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

मुंबई कट्टा :- १९ /२० मे २०१२

स्पा ·
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-38273/maps) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा

कलाईगनर

चैतन्य गौरान्गप्रभु ·
राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी! डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे.