फार फार पूर्वीची गोष्ट
फार फार पूर्वी... अगदि माणूसही तिथे कधी गेला नसेल अशा निबिड,किर्र अरण्यातली गोष्ट आहे. ही आम्हा घोड्यांची गोष्ट आआहे.शाकाहारी चतुष्पादांची गोष्ट आहे.
घनदाट जंगल होतं. दिवसाही धड सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचू शकत नसे इतकी दाट वनराई. सगळं कसं हिरवंगार.
त्यावर जगणारे आम्ही खूप सारे घोडे, झेब्रे नि तत्सम कळप. आम्ही घोडे फारच सुखाने जगू असं काही नाही, त्यांचीही आपसात भांडणे होत. पण एकूणात खूप काही खायला मिळे. एकदम जंगलातलं वातावरण पालटलं. एकाएकी पिवळ्या रंगाचा कुणी, अंगावर काळे पट्टे असणारे एक मोठ्ठे मांजर की बोका जोरदार गर्जना करत आले.