Skip to main content

मुक्तक

चहा-साखरेचे डबे

लेखक कवितानागेश यांनी सोमवार, 02/07/2018 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
चहा-साखरेचे डबे .... प्रत्येक घरात असतात. त्यांनी तसंच राहायचं असतं, एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात! त्यांची जागाही ठरलेली असते. हाताशी सहज येतील, पटकन दिसतील अशी सोयीची जागा. आणि डबे सुध्दा ठरलेले असतात. जवळजवळ एकसारखे, थोडे लहानमोठे. त्यांनी तसं च राहायचं असतं. एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात! त्यांच्या खुणेनी इतरही वस्तू आजूबाजूला येतात आणि जातात. पण या दोघांचा मात्र उल्लेखही एकत्रच होतो. चहासाखरेच्या डब्यांची फळी, असाच पत्ता असतो तिथला. वास्तविक चहा आणि साखरेत काहीही साम्य नाही. पण सोयीसाठी म्हणून, कधीतरी, कुणीतरी त्यांना एकमेकांजवळ मांडलं.

सुखाचं मृगजळ

लेखक अबोलघेवडा यांनी बुधवार, 27/06/2018 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी एका मित्राची भेट झाली. थोडासा दुःखी वाटत होता. मी विचारलं काय झालं? तर म्हणाला बायकोशी पटत नाही. मी परत विचारलं, अरे हे काय अचानक? तर म्हणाला अचानक वगैरे काही नाही. तसं लग्न झाल्यापासूनच आमचं बऱ्याच गोष्टींवर पटत नाहीये. पण आता जरा त्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. त्याला म्हटलं अरे एकदा का कळलं ज्या गोष्टींवर पटत नाही की मग त्या गोष्टी उगाळा कशाला? ज्या गोष्टींवर तुमचं पटतं तेच बोलत जा ना तिच्याशी. तर मला म्हणाला ‘अरे तुला काय माहित आमचं कुठल्या गोष्टींवर पटतं ते.

प्रकाश

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 23/06/2018 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
त्या हातांचे मेहंदीभरले तळवे तळव्यांमध्ये दिवा दिव्यात तेल तेलावर वात वातीचा प्रकाश अन् प्रकाश थेट चेहर्‍यावर . . . प्रकाशाचा वेगच अफाट |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०६/२०१८)

कितीसा पुरोगामी आहेस ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/06/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

गूढ अंधारातील जग -९ पुढे

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 16/06/2018 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -९ पुढे पाणबुडीतील सैनिकांचे मानसिक प्रश्न हे सामान्य सैनिकांपेक्षा वेगळे असतात. धातूच्या नळकांड्यात बंद असताना बाहेरचे काहीही दिसत नाही. जेवढे दिसते ते यंत्राच्या पडद्यावरच, ते सुद्धा प्रकाशमान बिंदूंची आकृती, जी आपण प्रत्यक्षात कधीच पाहिलेली नसते. त्यातून तुम्ही शत्रूच्या प्रदेशात किंवा जवळ गस्तीसाठी जाता तेंव्हा शत्रूने पेरून ठेवलेले पाणसुरूंग किंवा शत्रूच्या गस्त घालणाऱ्या पाणबुड्या यांच्याशी सामना होण्याची सतत असणारी भीती. शिवाय शत्रूचे टेहळणी करणारे उपग्रह किंवा विमाने आणि जहाजे यांची भीती.

गूढ अंधारातील जग -९

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 13/06/2018 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -९ पाण्याखालचे वैद्यकशास्त्र आता पर्यंत आपण पाणबुडीतील व्यवहार कायकाय आहेत ते पाहिले. आता पाणबुडीतील सैनिकांना आणि डॉक्टरांना कोणत्या शारीरिक आणि मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते ते पाहणार आहोत.

बांडगूळं

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 11/06/2018 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
बांडगूळं आधीही दिसायची… पण, ती रानात. राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर… ....जुन्या खोडांवर. आता मात्र ती दिसतात अगदी कुठेही… म्हणजे... रोपांवर वगैरे. इथपर चाललं असतं पण आता ती यायला लागलीत तणांवर.. माजलेल्या… …विचारांच्या तणांवर! संदीप चांदणे (११/६/२०१८)
काव्यरस

आनंदाचं रोपटं

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 10/06/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाचं रोपटं आमच्या घराबाहेर एक कुठलं तरी रोपटं आलंय. नको नको म्हणून आलेलं अगदीच unwanted child म्हणा ना. पण ते झाड. झाड कसलं रोपटं म्हणा ना मला खूप खूप आनंदी वाटतंय. काल अचानक आलेला पाउस सोसाट्याचा वारा त्याने खूप enjoy केलंय. आजचा मळभ-उन्हाचा खेळ ते स्वत: खेळतंय. मला ते रोपटं मनापासून आवडलेय. शेजारी राहायला आलेलं एखादं गोंडस मूल आपल्याला कसं आवडतं ना तसेच ते मला आवडलंय. ते माझं गोड आनंदाचे रोपटं आहे. आज सकाळी आमच्या वॉचमनच्या मुलीसाठी मी चॉकलेट दिलेय. आज माझा दुपारचा जेवणाचा डबा मी सहकारी मित्रांबरोबर शेयर केलाय. घरी बायकोला फोन करून आजचं जेवण खूप सुंदर झालंय म्हणून सांगितले आहे.

मा फलेषु ....

लेखक सचिन बोकिल यांनी शनिवार, 09/06/2018 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या खाण्याशी संबंधित आठवणींमध्ये एक कप्पा फळं आणि त्यांच्याशी निगडीत आठवणीनी व्यापला आहे. फळं तरी आणि किती प्रकारची ! वेगवेगळी फळं आणि ती खाण्याच्या वेळा आणि प्रकार ह्याची माझ्या मनामध्ये अशी काही सांगड बसली आहे की जर मी तसा केला नाही तर मला ते फळ खाल्ल्यासाखंच वाटत नाही ! फळ हे मला तरी कधीच ते केवळ गोड किंवा आंबट किंवा तुरट आहे म्हणून किंवा त्यातून विटामिन्स मिळतात म्हणून खावसं वाटलं नाही. त्याचे रंग, वास आणि खाताना येणारा अनुभव हे पैलू माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. आणि आठवणी तरी किती ..

रेम्माम्मा रेम्माम्मा रे..

लेखक गवि यांनी रविवार, 03/06/2018 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
भेंड्या खेळाव्यात. मुळातच हरकत किंवा वैर नाही. छान बैठा खेळ आहे. उगीच पळापळ नको. जरा मधेमधे चारेक टाळ्या वाजवल्या की झालं. आणि बसने वगैरे दूर दूर जाताना, ऍज अ टुरिस्ट ग्रुप हक्काचं आपलं मराठी माणूस आपल्याला मुंबई ते मुंबई हाकलून हाकलून परत आणताना... किंवा नातेवाईक मिळून टेम्पो ट्रॅव्हलरने तीन दिवसांत अष्टविनायक "करत" असताना .. उपयोगी पडतो वाटेत हा खेळ. जनरली एक पन्नाशीतले तरुण काका बसमध्ये हे सुरु करतात. त्यांना गायची आवड असते. सगळी गाणी तेच काका म्हणतात. इतरजण पहिला अर्धा तास जोरात आणि मग क्षीण टाळ्या वाजवतात. खर्ज आवाजात पुटपुट करत ओठ गाण्यानुसार हलवतात.